Road Accident:मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने कार जोरदार धडकली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा गावाजवळ शुक्रवारी अचानक ब्रेक लावलेल्या ट्रकला कार धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला.

Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Road Accident: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा गावाजवळ शुक्रवारी अचानक ब्रेक लावलेल्या ट्रकला कार धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला.  या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला आहे. रत्नाराम देवसिया (31) असे मृताचे नाव असून ते 15 सप्टेंबर रोजी आपल्या कुटुंबासह राजस्थानला जात असताना हा भीषण अपघात झाला. NH 48 च्या गुजरात लेनवर कंटेनर ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागील कार ट्रकला धडकली.

या अपघातात मृत चालकाची पत्नी आणि दोन मुले जखमी असून त्यांना कासा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकला अचानक ब्रेक लागल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटून ट्रकवर धडकला असावा, अशी प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. या घटनेची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला. या अपघातात कारचे भरपूर नुकसान झाले आहे. कार समोर धडकल्याने कारचा समोरचा भाग संपुर्ण चक्काचूर झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement