Mumbai: चेंबूरमध्ये विवाह सोहळ्यात 200 हून अधिक लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा; FIR दाखल
विवाह समारोहात एसओपीचे उल्लंघन केल्याबद्दल छेड़ानगर जिमखाना व वधू-वरच्या पालकांविरोधात IPC च्या 188, 269 आणि 34 अंतर्गत टिळक नगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
Mumbai: चेंबूर येथे एका विवाह सोहळ्यात 200 हून अधिक लोकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केले. विवाह समारोहात एसओपीचे उल्लंघन केल्याबद्दल छेड़ानगर जिमखाना व वधू-वरच्या पालकांविरोधात IPC च्या 188, 269 आणि 34 अंतर्गत टिळक नगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. चेंबूरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातील कोविड प्रकरणात अचानक झालेल्या वाढीमुळे सरकारला लॉकडाउनचे नियम नव्याने लागू करण्यास भाग पाडले आहे. महाराष्ट्र सरकारने लोकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. (वाचा - औरंगाबाद शहरातील सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद; महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांचे आदेश)
कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर सोमवारपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लॉकडाउन लागू करण्यात आले. राज्यातील सर्वाधिक कोरोना संक्रमित क्षेत्र असलेल्या अमरावती जिल्ह्यातील विदर्भात आज रात्री 8 वाजल्यापासून एका आठवड्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ही बंदी 1 मार्चपर्यंत लागू राहील, असे मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. (नागपूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमावली कडक; शाळा, कॉलेज ते लग्नाचे हॉल बंद करण्याबाबत नितीन राऊत यांनी दिले हे आदेश)
कोविडची परिस्थिती आणखी बिकट झाली तर कडक लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, आज नागपूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, नागपूर मध्ये कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास 7 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत.