Thane Cyber Fraud: ठाणे येथे MNC कंपनीचा MD सायबर चोरांच्या गळाला, कस्टम अधिकारी असल्याचे सांगून 4.80 कोटी रुपयांचा गंडा
ठाणे (Thane) येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या (Multinational Company) 67 वर्षीय माजी व्यवस्थापकीय संचालकाला ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 4.80 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
ठाणे (Thane) येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या (Multinational Company) 67 वर्षीय माजी व्यवस्थापकीय संचालकाला ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 4.80 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सायबर चोरट्यांनी (Cyber Fraud) ज्येष्ठ नागरिक असलेल्या या माजी व्यवस्थापकीय संचालकास हेरले आणि त्याच्याशी संपर्क साधला. आपण कस्टम अधिकारी असल्याचे भासवून चोरट्यांनी पीडितावर अंमली पदार्थ तस्करीत त्याचा सहभाग असल्याचा आरोप केला. तसेच, पोलीस कारवाई करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पीडिताची तब्बल 4.80 कोटी रुपयांची फसवणूक केली, असे ठाणे गुन्हे शाखा अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था पीटीआयसोबत बोलताना सांगितले.
कस्टम अधिकारी असल्याची बतावणी
ठणे पोलिसांच्या सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ माजी व्यवस्थापकीय संचालकाने दिलेल्या तक्रारीवरुन तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पीडिताला मध्यवर्ती एजन्सीचे अधिकारी असल्याचे सांगितले. आपण उच्चपदस्थ असल्याचे भासवून त्याच्याकडून बँक खात्याचे गोपनीय तपशील मिळवले. ज्यानंतर बँक खात्यावरील रक्कम इतर खात्यांमध्ये वळती करुन पीडिताची सायबर फसवणूक केली, असे सायबर पोलिसांनी सोमवावरी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला नुकताच आरोपीकडून एक कॉल आला, ज्याने MDMA, नऊ कालबाह्य झालेले पासपोर्ट आणि क्रेडिट कार्डसह काही प्रतिबंधित वस्तू असलेले एक अग्रगण्य कुरिअर कंपनीच्या कस्टम कार्यालयात तैवानच्या मार्गात पार्सल रोखल्याचा दावा केला. तसेच, त्यांनी पीडितेला सांगितले की त्यांच्याकडे आधार कार्ड क्रमांकासह त्याची वैयक्तिक माहिती आहे, ज्यामुळे तो स्कॅनरखाली आहे. (हेही वाचा, Investment Scam: गुंतवणूक घोटाळा; 73 वर्षीय उद्योजकाची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक; कापड कारखाना मालकास अटक)
पीडित भांबावला सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सापडला
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी थेट कस्टमचा उल्लेख केल्याने पीडित व्यक्तीही भांबावला आणि आरोपींच्या जाळ्यात सापडला. आरोपींनी पीडिताला मुंबईतील अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या कथित गुन्ह्याची माहिती दिली. त्याला अटक वॉरंट मिळण्याची आणि मनी लाँड्रिंग आणि ड्रग पेडलिंगला प्रतिबंध करण्याच्या तरतुदींनुसार त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची धमकी दिली. कारवाईपासून वाचण्यासाठी आरोपींनी पीडिताला सांगितले की, त्याने एक व्हिडिओ कॉलिंग अॅप्लीकेशन डाऊनलोड करावे. ज्याद्वारे अधिकारी त्यांची चौकशी करु शकतील. तपासाच्या नावाखाली आरोपींनी पीडिताचे बँक खात्याचे तपशील मिळवले आणि त्यांचे बँक खाते हातोहात रिकामे केले. धक्कादायक म्हणजे आरोपींनी या वेळी केंद्रीय एजन्सीचे अधिकारी म्हणून ओळख पटावी यासाठी खोठे सही, शिक्के वापरले. एजन्सीचा बनावट लोगोही वापरला. ज्यामुळे पीडिताला आरोपींची तोतयेगिरी ओळखणे दुरापस्त झाले. (हेही वाचा, Indians Saving And Investment: बँकांमधील बचत घटतीय, भारतीयांचा पैसा जातोय तरी कोठे? काय आहे गुंतवणूक फंडा?)
चौकशीच्या नावाखाली बँक खाते रिकामे
चौकशीच्या नावाखाली आरोपींनी पीडिताला फोन कॉल सुरुच ठेवण्यास सांगितले. तसेच, दुसऱ्या दिवशी त्याला त्याचे बँकेचे व्यवहारांचे तपशील मागितले. त्याच्यावर बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप केला. तसेच, अधिक तपासासाठी इतरही काही आर्थिक तपशील मागितले. आरोपींनी पीडिताला त्याच्या पत्नीच्या बँक खात्यावर 1 कोटी रुपये हस्तांतरीत करण्यास सांगितले. दरम्यान, बराचसा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पीडिताला संशय आला. त्याने यूकेमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलाशी चर्चा केली. त्यावेळी त्याला समजले की, आपली फसवणूक झाली आहे.
सायबर पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये पीडितेच्या खात्यातून 4.80 कोटी रुपये काढण्यात आल्याचे आढळून आले आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्रकरणाचा तपास सुरु आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)