Online Fraud In Pune: पुण्यात महिलेची ऑनलाईन फसवणूक, गमावले 45 हजार

ही घटना खरंतर गेल्या वर्षात मे महिन्यात घडली होती. परंतु या घटनेची तक्रार याआधीच्या महिन्यात करण्यात आली होती.

fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

Online Fraud In Pune: पुण्यातील एका महिलेची 45 हजार रुपयांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना खरंतर गेल्या वर्षात मे महिन्यात घडली होती. परंतु या घटनेची तक्रार याआधीच्या महिन्यात करण्यात आली होती. पीडित महिला ही पॅथलॉजी लॅबची मालक आहे. फसवणूकदाराने स्वत:ला सिक्युरिटी पर्सनल असल्याचे सांगत तिची फसवणूक केली.(ठाणे: भिवंडी मध्ये वीटभट्टी मजुराच्या घरावर कोसळला ट्रक; 3 चिमुकलींचा मृत्यू)

इंडियन एक्सप्रेसनुसार, पीडितेला मे 2021 रोजी फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने तिला तो सिक्युरिटी फोर्समधील असून त्याला पुण्यातील इंटरनॅशनल विमानतळावर तैनात केल्याचे सांगितले. अभिषेक गुप्ता असे त्याने त्याचे नाव सांगितले. आरोपीने महिलेला सहा जणांच्या रक्ताची चाचणी करायची असून त्या संदर्भातील शुल्काबद्दल विचारायचे होते असे सांगितले.

पीडितेने आरोपीला म्हटल की, तिच्या लॅबमध्ये  3 हजार रुपये प्रती व्यक्ती रक्ताच्या चाचणीसाठी घेतले जातात. महिलेला विश्वासात घेत आरोपीने तिला त्याचे आयडी कार्ड आणि 5 रुपये गुगल पे च्या माध्यमातून तिला पाठवले. रिपोर्ट्सनुसार, पैसे आले की नाही ते तपासून पहा आणि फोन करा असे त्याने तिला सांगितले. जेव्हा महिलेने तिचे बँक खाते तपासले तेव्हा तिच्या खात्यातून 45 हजार रुपयांची रक्कम काढली गेली होती. यासाठी दोन ट्रांजेक्शन झाले होते.(Barshi Stock Market Froud: बार्शीतील विशाल फटे फसवणूक प्रकरणात धक्कादायक माहिती, गुंतवणुकदारांचे पैसे शेअर्समध्ये गुंतवलेच नाहीत!)

महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, कोर्टाने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.