IPL Auction 2025 Live

अमरावती: वाघांच्या मृत्यूचं सत्र सुरूच, चिखलदरा परिसरामध्ये मृतावस्थेत आढळला वाघ

प्रतिकात्मक फोटो (Photo credits: Pixabay, skeeze)

महाराष्ट्रामध्ये वाघांच्या मृत्यूचं सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. अवनीची हत्या  त्यानंतर काही दिवसांपूर्वी वाघ नर -मादींवर विषप्रयोग करण्यात आल्याचे वृत्त होते आणि आज विदर्भात अजून एका वाघाचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. मेळघाटातील पूर्वे दिशेच्या परिसरात चिखलदऱ्याच्या मोथा गावात ही घटना घडली आहे. भंडारा: आणखी एका वाघिणीचा मृतदेह सापडला; दोन दिवसात दोन वाघांचा मृत्यू

अमरावती चिखलदरा परिसरात मेळघाटात एक वाघ मृत्यू मुखी पडल्याचं वृत्त समोर आलं आहे. वाघाच्या मृत्यू मागील नेमकं कारण अजूनही समोर आलेले नाही. मात्र लवकरच वनखात्याकडून त्याची तपासणी करून मृत्यूचं कारण स्पष्ट केलं जाणार आहे. मागील काही दिवसात विषप्रयोगातून वाघाचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

काही महिन्यांपूर्वी वनखात्याने अवनी वाघिणीची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रभर या घटनेचे पडसाद उमटले होते. एकीकडे वाघांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे वनखातंच अशाप्रकारे वाघांची हत्या करणं चुकीचं असल्याचे मत समोर आहे.