OBC Reservation: कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यातील पोटनिवडणूक पुढे ढकला किंवा थांबवा, छगन भुजबळ यांची मागणी
यावर आता राज्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
OBC Reservation: देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता पोटनिवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. यावर आता राज्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भुजबळ यांनी असे म्हटले की, निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक घेण्यास वेळ आहे. मात्र पाच जिल्ह्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जाहीर करण्यात आलेल्या निवडणूका पुढे ढकलाव्यात. अथवा त्या स्थगित कराव्यात अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. त्याचसोबत ओबीसी नेतेमंडळी सुद्धा आरक्षण रद्द झाल्यानंतर आक्रम झाले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्ष रद्द केल्यानंतर पाच राज्यातील पोटनिवडणूकांची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणूका खुल्या प्रवर्गातून होणार असल्याने भुजबळ यांनी त्याला आपला विरोध दर्शवला आहे. निवडणूक स्थगित करण्यासंदर्भात प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवणार असल्याचे ही भुजबळ यांनी म्हटले आहे.(Maharashtra ZP Election 2021: महाराष्ट्रातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर)
तर आरक्षण रद्द केल्यानंतर पोटनिवडणूकांची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा, तसेच त्याअंतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलैला मतदान होणार आहे. तर, 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मदान यांनी दिली आहे.(पुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाचा पदभार घनकचरा विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे)
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच भुजबळ यांनी मराठा मूक मोर्चावेळी सहभागी होत ओबीसी आरक्षणावरुन आपली भुमिका मांडली होती. त्यावेळी भुजबळ यांनी असे म्हटले की, मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण गरजेचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भुमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली होती.