ठाणे: मुंबई लोकलमध्ये अचानक घुसले NSG कमांडो, प्रवाशांनाही कळले नाही काय झालंय

हा फोटो 28 फेब्रुवारीचा असल्याचे समजते. 28 फेब्रुवारी रोजी एनएसजी कमोंडोंचा सराव ठाणे स्थानकात पार पडला. या वेळी हा फोटो काढण्यात आल्याचे समजते.

Mumbai local | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

स्थळ ठाणे रेल्वे स्टेशन (Thane Railway Station) . दुपारी 12 वाजून 56 मिनिटांची वेळ. रेल्वेस्टेशनवर नेहमीप्रमाणेच गर्दी. ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (CSMT) जाणारी लोकल फलाटाला लागली. पण, नेहमीप्रमाणे या लोकलच्या डब्यात प्रवासी चढलेच नाहीत. लोकल फलाटाला लागताच फलाटावर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (NSG) शेकडो जवान दाखल झाले आणि पुढच्या काही सेकंदातच या जवानांनी ही लोकल भरून गेली.

राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान इतक्या मोठ्या प्रमाणावर अचानकच चढल्याने प्रवाशांमध्ये काहीशी घबराट आणि उत्सुकता निर्माण झाली. प्रवासी ट्रेनमध्ये इतके एनएसजी कमांडो कशासाठी चढतायत हा एकच प्रश्न प्रवाशांना सतावत होता. त्यामुळे लोकलमधील प्रवाशांमध्येही एकच खळबळ माजली. दरम्यान, सुरक्षा दलाचे हे मॉक ड्रील असल्याचे कळल्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला, प्रवासी ट्रेनमध्ये चढले.

एनएसजी कमांडोंनी हातात बंदूका घेऊन लोकलने प्रवास केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो 28 फेब्रुवारीचा असल्याचे समजते. 28 फेब्रुवारी रोजी एनएसजी कमोंडोंचा सराव ठाणे स्थानकात पार पडला. या वेळी हा फोटो काढण्यात आल्याचे समजते. (हेही वाचा, ठाणे महानगरपालिका कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज; कळवा येथील रुग्णालयामध्ये 8 बेडचा नवीन Isolation Ward)

दरम्यान, लोकसत्ता डॉटकॉमने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एनएसजी कमांडोंनी भरलेली ही ट्रेन 1 वाजून 12 मिनिटांनी कांजूरमार्ग स्टेशनवर पोहचली. कांजूरमार्ग स्टेशनवर या कमांडोंची दुसरी तुकडी लोकलमध्ये चढली. जवानांना ट्रेनमध्ये चढता यावे आणि या वेळी इतर कोणीही या लोकलमध्ये चढू नये यासाठी सुरक्षाव्यवस्था अधिक तैनात करण्यात आली आहोत. ही लोकल

सीएसएमटीला पोहोचल्यावर एनएसजी कमांडोंचा सराव पूर्ण झाला.