अबब! नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती

यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नितीन गडकरी (Photo Credits: PTI)

काल सोमवारी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूर येथून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा प्रथमच उमेदवारांना गेल्या 5 वर्षाचे आयकर विवरण घोषित करण्याचा नियम केला गेला आहे. त्यानुसार गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. आश्चर्य दिलेल्या शपथपत्रानुसार गडकरी यांच्या पत्नी त्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत. गडकरी यांच्या पत्नी कांचन यांच्या उत्पन्नात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नुकतेच एका संस्थेने एक सर्वेक्षण केले होते ज्यामध्ये 2014 साली पुन्हा निवडून आलेल्या खासदारांची संपत्ती जाहीर करण्यात आली होती. यामध्ये देशात सुप्रिया सुळे तिसऱ्या क्रमांकावर होत्या. 51 कोटी असलेली त्यांची संपती 113 कोटी इतकी झाली होती. आता नितीन गडकरी यांच्या संपत्तीतही 140 टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. गडकरी यांची 2017-18 सालातील वार्षिक कमाई 6 लाख 40 हजार असून पाच वर्षापूर्वी ती 2 लाख 70 हजार होती. (हेही वाचा: राहुल गांधी यांच्या संपत्तीवर शंका; 2004 मध्ये 55 लाख, तर 2014 मध्ये 9 कोटी कशी?)

गडकरी यांच्याकडे एकूण 6 कोटी 90 लाख रुपयांची संपत्ती आहे. यांमध्ये वडिलोपार्जित घर, वरळी येथील सदनिका, 22 लाखांचे दागिने, एक अम्बेसिडर व एक होंडा कार यांचा समावेश आहे. दरम्यान नुकतेच केंद्रीय कायदा व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उत्पन्नाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. एक फक्त खासदार असलेल्या राहुल गांधी यांची संपत्ती 2004 मध्ये 55 लाख होती, तर 2014 मध्ये ती 9 कोटींवर कशी काय गेली? असा प्रश्न रविशंकर यांनी विचारला आहे.