Nisarga Cyclone Tracker: अरबी समुद्रात 3 जून पर्यंत तीव्र होणार चक्रीवादळ; पहा 'निसर्ग' चक्रीवादळाच्या प्रवासाच्या प्रत्येक दिवसाचे अंदाज

दरम्यान अरबी समुद्रात साऊथ वेस्ट भागात कमी दाबाचा पट्टा गहिरा होऊन हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

IMD prediction on Cyclone Nisarga. (Photo Credit: Twitter)

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळ 3 जूनपर्यंत धडकण्याची शक्यता आहे. पुढील 12 तासात अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ अजून खोल जाण्याची शक्यता आहे. तर पुढील 24 तासामध्ये म्हणजे 2 जून पर्यंत ते 'Cyclonic Storm' होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 'Severe Cyclonic Storm'चं स्वरूप 3 जून पर्यंत निर्माण होऊ शकतं. सध्या अरबी समुद्र आणि लक्षद्वीप जवळ असणारा कमी दाबाचा पट्टा हा गोव्याच्या पणजी पासून साऊथ वेस्ट कडे 400 किमी. मुंबई पासून साऊथ वेस्टच्या दक्षिणेला 700 किमी आणि सुरत पासून साऊथ वेस्टच्या दक्षिणेला 930 किमी आहे. असा अंदाज IMD कडून देण्यात आला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात किनारपट्टीवर जून महिन्यात चक्रीवादळ धडकण्याची हा प्रसंग 129 वर्षांनंतर येणार आहे. दरम्यान अरबी समुद्रात साऊथ वेस्ट भागात कमी दाबाचा पट्टा गहिरा होऊन हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

IMD चा अंदाज

1 ते 4 जून दरम्यान चक्रीवादळाचा असा  असेल प्रवास  

Date/Time(IST) Position(Lat. 0N/ long. 0E) Maximum sustained surface wind speed (Kmph) Category of cyclonic disturbance
01.06.20/0530 13.0/71.4 40-50 gusting to 60 Depression
01.06.20/1130 13.3/71.2 45-55 gusting to 65 Depression
01.06.20/1730 13.7/71.0 50-60 gusting to 70 Deep Depression
01.06.20/2330 14.2/70.9 55-65 gusting to 75 Deep Depression
02.06.20/0530 14.9/70.8 60-70 gusting to 80 Cyclonic Storm
02.06.20/1730 15.7/70.9 80-90 gusting to 100 Cyclonic Storm
03.06.20/0530 17.0/71.4 90-100 gusting to 110 Severe Cyclonic Storm
03.06.20/1730 18.4/72.2 105-115 gusting to 125 Severe Cyclonic Storm
04.06.20/0530 19.6/72.9 95-105 gusting to 115 Severe Cyclonic Storm
04.06.20/1730 20.8/73.5 60-70 gusting to 80 Cyclonic Storm

दरम्यान आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळ 2 जूनला उत्तरेच्या दिशेने सरकेल. त्यानंतर नॉर्थ ईस्टच्या उत्तर दिशेला सरकरत महाराष्ट्राच्या उत्तर भागात आणि गुजरातच्या दक्षिण भागात 3 जून पर्यंत धडकणार आहे. यावेळेस ते रायगडच्या हरिहरेश्वर आणि दमण भागात 3 जून पर्यंत असेल. पुढील 24 तासामध्ये ते मंदावेल असेदेखील अंदाज आहेत.