New Year's Eve 2019: मुंबईकरांचे 31 डिसेंबर सेलिब्रेशन स्पेशल करण्यासाठी BEST बस, लोकल ते हॉटेल, बार पर्यंत 'या' सुविधा मध्यरात्री पर्यंत राहणार सुरु
31ST सेलिब्रेशन मध्ये कोणतीही समस्या येऊ नये याकरिता मुंबई लोकल, बेस्ट बस यांच्याकडून मध्यरात्री काही खास गाड्या चालवण्यात येणार आहेत तर बार आणि हॉटेल देखील रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
31st Celebration In Mumbai: 2020 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आता अवघे काहीच तास शिल्लक आहेत, मित्रमैत्रिणी व जवळच्या व्यक्तींसोबत नव वर्षाची ही पूर्वसंध्या साजरी करण्यासाठी तुम्हीही आतापर्यंत प्लॅनिंग केले असेलच हो ना? मुंबईत (Mumbai) देखील 31ST डिसेंबरचे सेलिब्रेशन अगदी धुमधडाक्यात असते, अर्थात आता जर का तुम्ही अस्सल मुंबई कर असाल तर बॅण्डस्टॅण्ड (Bandstand) वर, मरीन लाईन्स (Marine Lines) वर या रात्री होणारे सेलिब्रेशन तुम्हाला वेगळे सांगायला नकोच. यंदा तुम्हीही जर का यापैकी कोणत्या ठिकाणी जाऊन तुमचे नववर्ष साजरे करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही आनंदाच्या बातम्या आम्ही सांगणार आहोत. 31ST सेलिब्रेशन मध्ये कोणतीही समस्या येऊ नये याकरिता मुंबई लोकल, बेस्ट बस यांच्याकडून मध्यरात्री काही खास गाड्या चालवण्यात येणार आहेत तर बार आणि हॉटेल देखील रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
काय आहेत या सुविधा चला तर पाहुयात..
मध्य रेल्वे जादा लोकल
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (CSMT) ते कल्याण (Kalyan) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेल (Panvel) अशा मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर खास ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या ट्रेन्स 31 डिसेंबरच्या रात्री चालवल्या जातील. वाचा सविस्तर
पश्चिम रेल्वे जादा लोकल
पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) 8 विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. या विशेष लोकल्स 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री धावतील. यामध्ये चर्चगेट ते विरार (Churchgate to Virar) अशा 4 आणि विरार ते चर्चगेट (Virar to Churchgate) अशा 4 ट्रेन्स धावणार आहेत. वाचा सविस्तर
BESTच्या जादा बस सेवा
बेस्टच्या माहितीनुसार, 007- (बॅक बे डेपो ते विक्रोळी पार्क साइट), 111- (सीएसटी ते श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (रिगल सिनेमाजवळ), 112 - (चर्चगेट ते गेट वे ऑफ इंडिया), 203- (जुहू बीच ते दहिसर ब्रिज), 231 - (सांताक्रूज रेल्वेस्थानक ते जुहू बसस्थानक), 247 - (बोरिवली स्थानक पश्चिम ते (रिंगरुट) गोराई पंपिंग स्टेशन, बोरिवली जेल, टेलिफोन एक्स्चेंज, बोरिवली बसस्थानक, पश्चिम), 294 - (बोरिवली पश्चिम ते गोराई ब्रिज, पेप्सी गार्डन, गोराई डेपो, महाराष्ट्र नगरमार्गे बोरिवली स्थानक पश्चिम (रिंगरुट) रात्री 10 वाजल्यापासून या मार्गांवर 20 बस सोडण्यात येणार आहेत . मुंबई: नववर्षाच्या स्वागतासाठी वांद्रे येथील महत्त्वाच्या मार्गांवर करण्यात आली विशेष वाहतूक व्यवस्था; पार्किंगसाठी खास उपाययोजना
मद्यविक्री दुकानांना वाढीव वेळ
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, 31 डिसेंबर ला राज्यातील रेस्टॉरंट व बार तसेच मद्य विक्री (Alcohol Selling) दुकाने पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Year Ender 2019: कपिल शर्मा, एकता कपूर आणि 'हे' सेलेब्स बनले 2019 मध्ये पालक
दरम्यान, 31 डिसेंबरच्या रात्री धम्माल करताना स्वतःची सुरक्षा अगदी आवर्जून पाहावी असाही पोलिसांनी इशारा केला आहे. या रात्री पार्ट्यांच्या वेळी कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठे इमुंबई पोलिसांची विशेष तुकडे सज्ज करण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)