New Year Celebration in Mumbai: यंदा बोटीवर किंवा इमारतीच्या गच्चीवर नवं वर्षाच्या पार्ट्यांना परवानगी नाही, नियमाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
या दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर नियमांचे पालन होते की नाही पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
New Year Celebration in Mumbai: देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसची परिस्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे नागरिकांना वेळोवेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे अशा सूचना दिल्या जात आहेत. तर नुकत्याच राज्य सरकारने विदेशात आलेल्या नव्या कोरोनाच्या रुपामुळे ख्रिसमससह थर्टी फर्स्टमुळे रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचार बंदी लागू केली आहे. या दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर नियमांचे पालन होते की नाही पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.(Mumbai: कल्याण मधील चस्का कॅफेआड सुरु असलेल्या हुक्का पार्लवर गुन्हे शाखेकडून छापेमारी, 80 हून अधिक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल)
नवं वर्षाच्या स्वागतासाठी जंगी पार्ट्यांचे आयोजन विविध ठिकाणी केले जाते. परंतु सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रेस्टॉरंट, बार, पब रात्री 11 वाजताच बंद करावेत असे आदेश ही दिले गेले आहेत. तसेच नवं वर्षाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत तब्बल 35 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी जरा जपूनच थर्स्टी फर्स्टची पार्टी करावी अन्यथा कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. ऐवढेच नाही तर बोटीसह इमारतीच्या गच्चीवर ही पार्ट्यांना थर्टी फर्स्टच्या दिवशी पार्टी करण्यास परवानगी नसणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.(Night Curfew: रात्रीच्या 'संचारबंदी'दरम्यान प्रवाशांना मुंबई विमानतळावरून ये-जा करण्याची परवानगी)
तसेच संचार बंदीच्या काळात चार पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करु शकत नाही. पण बाईकवरुन दोन जण किंवा गाडीतून चार जणांना प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. त्याचसोबत नागरिकांनी मुंबईत आपल्या आवडीच्या ठिकाणी जाऊ शकतात पण तेथे सुद्धा कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. थर्टी फर्स्टच्या जोशात दरवर्षीप्रमाणे ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह करणाऱ्या चालकांवर ही पोलिसांची करडी नजर असणार आहे.
खरंतर नव्या वर्षासाठी करण्यात येणाऱ्या पार्ट्यांसाठीच महापालिकेने हा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. तर महापालिकेने नुकत्याच नाइट क्लबमध्ये रेड टाकली असता कमी जागेतच नागरिकांकडून मास्क न घालता पार्टी करत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर लोअर परेल ते मलाड पर्यंत नाइट क्लबवर छापेमारी करत महापालिकेने लाखो रुपयांचा दंड ही वसूल केला. तसेच या क्लबच्या विरोधात एफआयआर ही दाखल केला आहे