अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईत शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईतील (Mumbai) शरद पवार यांच्या सिलव्हर ओक निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत ही बैठक पार पडली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे (National Congress Party) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी अचानक आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाणा आले आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईतील (Mumbai) शरद पवार यांच्या सिलव्हर ओक निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) , जयंत पाटील (Jayant Patil), प्रफुल्ल पटेल Prafull Patel आणि पार्थ पवार (Parth Pawar) उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांच्या अनुपस्थितीत ही बैठक पार पडली आहे.
अजित पवार यांनी शुक्रवारी अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. अजित पवार यांनी कशामुळे हा निर्णय घेतला, अद्याप या मागचे कारण समजू शकले नाही. अजित पवार यांनी स्वत: विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कार्यालयात जाऊन राजीनामा सुपूर्त केला. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राजीनामा दिल्यापासून अजित पवार यांचा फोन देखील बंद लागत आहे. अद्याप विषयावर अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. हे देखील वाचा- अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत शरद पवार म्हणाले..
शरद पवार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, "राज्य बँक घोटाळा प्रकरणात माझे नाव आल्याचे अजित पवार यांना आवडले नसावे. त्यांना या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला असावा. त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला कळली. पण, त्यांनी नेमका कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे समजू शकले नाही. मी त्यांच्या चिरंजीवाशी संपर्क साधला असता, सध्याची राजकारणाची पातळी कमालिची घसरली आहे. त्यामुळे राजकारण सोडून शेती उद्योग केलेला बरा असा सल्ला त्यांनी दिला", असे शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत सांगितले. अद्याप आपली आणि अजित पवार यांची भेट झाली नाही, असेही शरद पवार म्हणाले.
अजित पवार हे लढवय्ये आहेत. थोड्याशा कारमामुळे तलवार म्यान करणे हा त्यांचा स्वभाव नाही. परंतू, तडखाफडकी निर्णय घेणे हा त्यांचा स्वभाव मला माहित आहे. पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून मी या प्रकरणीत लक्ष घालीन असेही शरद पवार या वेळी म्हणाले.