NCP Crisis: शरद पवार येत्या 8 जुलै रोजी घेणार पहिली सभा; ठिकाणही ठरलं, मातब्बर नेत्याला हादरा; घ्या जाणून

तसेच, लक्ष्यही ठरवले आहे. येत्या 8 जुलै रोजी पवार यांचची एक जंगी सभा नाशिक (Nashik) येथे पार पडत आहे. पवार यांनी आपले पहिले लक्ष्य छगन भुजबळ यांच्यावर केंद्रीत केले असून ते येवल्यात सभा घेणार असल्याचे समजते.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Sharad Pawar Public Meeting In Yewla: अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप आला. हे सगळे घडले तरी शरद पवार (Sharad Pawar) मात्र आपल्या नेहमीच्या शैलीत आहेत. प्रसारमाध्यमांना ते अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे जात आहेत आणि तितक्याच संयत परंतू आक्रमक पद्धीतीने बोलत आहेत. शरद पवार यांनी आपल्या समर्थकांची एक बैठक आज वायबी सेंटर येथे बोलावली आहे. दरम्यान, या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपले ध्येय निश्चित केले आहे. तसेच, लक्ष्यही ठरवले आहे. येत्या 8 जुलै रोजी पवार यांचची एक जंगी सभा नाशिक (Nashik) येथे पार पडत आहे. पवार यांनी आपले पहिले लक्ष्य छगन भुजबळ यांच्यावर केंद्रीत केले असून ते येवल्यात सभा घेणार असल्याचे समजते.

शरद पवार हे आपल्या दौऱ्याची सुरुवात नाशिकमधून करत आहेत. शरद पवार यांनी पक्षबांधणीला सुरुवातही केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे जुने नेते अॅड. माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माणिकराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने नेते आहेत. ते शरद पवार समर्थक आहेत. मात्र, मधल्या काही काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमधुन बाहेर पडले होते. शिंदे यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसोबत सिल्वर ओक गाठले आहे. (हेही वाचा, NCP Party Crisis: शरद पवार विरुद्ध अजित पवार, मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घमासान; दोन वेगवेगळ्या बैठकांसाठी आमदार रवाना)

दरम्यान, शरद पवार लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. येत्या आठ जुलै रोजी ते पहिली सभा घेतील. ही सभा नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पार पडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार समर्थक) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान छगन भुजबळ हे अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. सध्या ते अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आहेत. या ठिकाणी त्यांचे समर्थकही उपस्थित असल्याचे समजते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif