शरद पवार यांचा मुंबईतील आयएफएससी सेंटर गुजरातच्या गांधीनगरला हलविण्यास विरोध: पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहलं पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील आयएफएससी सेंटर गुजरातच्या गांधीनगरला हलविण्यास विरोध दर्शवला आहे. आयएफएससी सेंटर मुंबईलाच ठेवा. हे सेंटर गुजरातला हलविल्यास देशाचं आर्थिक नुकसान होईल. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईची पत घसरेल, असंही शरद पवार यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारने आयएफएससी सेंटर संदर्भात घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असल्याची टीकाही पवार यांनी केली आहे.

शरद पवार यांचा मुंबईतील आयएफएससी सेंटर गुजरातच्या गांधीनगरला हलविण्यास विरोध: पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहलं पत्र
Sharad Pawar (Photo Credits: IANS)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मुंबईतील आयएफएससी सेंटर (IFSC) गुजरातच्या (Gujarat) गांधीनगरला (Gandhinagar) हलविण्यास विरोध दर्शवला आहे. आयएफएससी सेंटर मुंबईलाच ठेवा. हे सेंटर गुजरातला हलविल्यास देशाचं आर्थिक नुकसान होईल. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईची पत घसरेल, असंही शरद पवार यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारने आयएफएससी सेंटर संदर्भात घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असल्याची टीकाही पवार यांनी केली आहे.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र (IFSC) गुजरातमध्ये हलवण्यात येणार आहे. याबद्दल केंद्र सरकारने निर्णयही घेतला आहे. मात्र, केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात नाराजीचा सुर पसरला आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे मुंबईऐवजी गुजरातच्या गांधीनगरमध्ये होणार आहे. यासंदर्भात 27 एप्रिलला केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Coronavirus In India Update: कोरोनाच्या 2644 नव्या रुग्णांसह देशातील एकूण बाधितांची संख्या 39,980 वर; आजवर देशात 1301 मृत्यूंची नोंद, जाणून घ्या आजची आकडेवारी))

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी केंद्राचा हा निर्णय धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. केवळ एकट्या मुंबईतून सर्वाधिक जास्त कर दिला जातो. गुजरातपेक्षा महाराष्ट्र हा सर्वात जास्त कर देणारे राज्य आहे. असं असतानादेखील मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय योग्य नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 03, 2020 01:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).