नवाब मलिक यांच्या भावाने कामगारांना केली मारहाण; व्हिडिओ होत आहे व्हायरल
त्याचा व्हिडिओ अनेक ठिकाणी फिरत असून तो जवळपास 1 महिन्यापूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी आज काही कामगारांना मारहाण केली असल्याची घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडिओ अनेक ठिकाणी फिरत असून तो जवळपास 1 महिन्यापूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. टीव्ही 9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या प्रभागात वर्क ऑर्डरशिवाय काम सुरु असल्याचं लक्षात आल्यामुळे कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली. इतकंच नव्हे तर कामगारांना हात पाय तोडण्याचीही धमकी देखील त्यांनी दिली. आणि याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबईतील कुर्ला येथे रस्त्याचे काम सुरु असताना, 4 कामगार पाईपमध्ये वायर टाकायचे काम करत होते. तेव्हा त्याठिनगरसेवक कप्तान मलिक हे तिथे पोहोचले आणि त्यांनी कामगारांकडे कामाच्या ऑर्डर दाखवण्याची मागणी केली. परंतु, त्या कामगारांनी कोणतीही ऑर्डर दाखवली नसल्याने, मलिक यांनी कामगारांना मारहाण करायला सुरुवात केली.
दरम्यान, या प्रकरणाबद्दल कप्तान मलिक म्हणाले, “तो खासगी ठेकेदार होता. तो महापालिकेचं नुकसान करत होता. त्याला एक दिवस आधीपण मी समजावलं होतं. जेव्हा मी त्यांना विनंती करुन काम थांबवण्यास सांगितलं, त्यादिवशी त्यांनी काम बंद केलं. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा ते तिथे आले. ते तिथे दादागिरीने काम करत होते. त्यांची ही दादागिरी थांबवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं.”
ट्विट-
शरद पवार यांच्या गावी जाणार उद्धव ठाकरे; बारामतीत मुख्यमंत्र्यांचं स्वागत होणार दणक्यात
ते असंही म्हणाले की, "मी मारहाण केली आहे. त्या व्हिडीओत देखील मी सांगितलं आहे की मी चुकीचं केलं तर माझ्यावर केस दाखल करा. मी जर चुकीचं केलं असतं तर त्या लोकांनी माझ्याविरोधात पोलीस तक्रार केली असती."