Maharashtra Budget Session 2022: महाराष्ट्र भाजप नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच, देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा सुतोवाच; आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापाण्यावरही बहिष्कार

आज विरोधी पक्ष भाजपा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणार्‍य चहापाण्याच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकणार आहे.

देवेंद्र फडणवीस | Twitter/ ANI

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)  सध्या ईडी (ED) कोठडी मध्ये आहेत. त्यांच्यावर दाऊद इब्राहीमला आर्थिक सहकार्य केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. आता याच प्रकरणावरून 3 मार्च पासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून मलिकांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं वारंवार ठणकावून सांगितल्यानंरतही आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Maharashtra LoP Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील, तर मग हेच म्हणावे लागेल की हे दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आज भाजपाची आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक झाली आहे. विरोधक नवाबांच्या राजीनाम्यासोबत शेतकर्‍यांचे प्रश्न, वीज कापल्याप्रकरणी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहेत. अजित पवारांनी दोनदा शब्द देऊन तो पाळला नसल्याचंही म्हणाले आहेत. नक्की वाचा: Nawab Malik Arrest: नवाब मलिक यांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा नाही, याचिकेवर 7 मार्चला होणार सुनावणी.

ANI Tweet

महाविकास आघाडीत असणार्‍या शिवसेनेची देखील कोंडी करण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला आहे. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात. असे त्यांनी एकेकाळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सुनावले आहे. देशद्रोह्यांशी संबंध हा सर्वात मोठा गुन्हा आहे. असे देखील ते म्हणाले आहेत. सारं मंत्रिमंडळ नवाबांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा प्रकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिला नाही.

आज विरोधी पक्ष भाजपा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणार्‍य चहापाण्याच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकणार आहे. राज्याचं 3 मार्चपासून सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्च पर्यंत मुंबईत पार पडणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीची प्रक्रिया देखील पार पडणार आहे. तर 11 मार्च दिवशी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.