Navi Mumbai: दोन महिन्यांच्या मुलीला 4 लाखात विक्री करणाऱ्या बाळाच्या आईसह डॉक्टरला पोलिसांकडून अटक

आरोपी हे एका 2 महिन्यांच्या मुलीला 4 लाखात विक्री करत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाळाच्या आईचा सुद्धा समावेश आहे.

Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

Navi Mumbai: कामोटे पोलिसांकडून 53 वर्षीय गायनाकोलॉजिस्टसह 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे एका 2 महिन्यांच्या मुलीला 4 लाखात विक्री करत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाळाच्या आईचा सुद्धा समावेश आहे. कामोटे येथील सेक्टर 8 मध्ये गायनाकोलिजिस्ट डॉ. पंकज पाटील यांचे फॅमिली हेल्थ केअर हॉस्पिटल आहे. तर अन्य दोन आरोपींमध्ये बाळाची आई अमिरन बानो बदर बक्ष आणि यामधील दोन मध्यस्थ व्यक्ती रजनी जाधव, रुकसार शेखचा समावेश आहे. रजनी ही डॉ. पाटील यांच्या क्लिनिक मध्ये हेल्पर नर्स म्हणून काम करते. तर आयवीएफ उपचासाठी रुखसर हा एग डोनर आहे.

कामोटे पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ अधिकारी स्मिता जाधव यांनी असे म्हटले की, त्यांना मिळालेल्या टीपनुसार सापळा रचून आरोपींना अटक केली. तर पोलिसांनी एका बनावट व्यक्तीला मुल खरेदी करण्यासाठी पाठवले. मंथन पाटील यांनी त्यांना मुल होणार नसल्याचे बाळ खरेदी करण्याचे म्हटले. त्यामुळे बाळाच्या आईला त्याला घेऊन येण्यास सांगितले. बाळाची आई अमिरीन ही दोन मध्यस्थी व्यक्तींसोबत क्लिनिक मध्ये आली. तर बाळ खरेदी करण्यासाठी पैसे दिले असता डॉ. पाटील यांनी ते ठेवले आणि बाळाला खरेदी करणाऱ्या महिलेकडे सोपवले. क्लिनिक बाहेर असलेल्या पोलिसांनी क्षणाचा विलंब न लावता तेथे छापा टाकला आणि सर्व आरोपींना अटक केली.(नाशिक: ST कर्मचाऱ्याच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; उच्च शिक्षण घेण्यास आर्थिक अडचण येत असल्याने उचलले टोकाचे पाऊल)

वरिष्ठ अधिकारी यांनी म्हटले की, अमिरीन हिने दावा केला तिने विक्री करण्यासाठी आलेले बाळ हे पाचवे होते. यापूर्वी तिला दोन मुल आणि एक मुलगी आहे. तिने असे म्हटले की, आर्थिक चणचण असल्याने मुलांचा सांभाळ करु शकत नव्हती. त्याचसोबत पाचव्या वेळेस गर्भवती असताना तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले होते. तर तिने गर्भपात करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण मुंबईतील डॉक्टरांनी त्यासाठी नकार दिला. कारण तिला गर्भवती होऊन 20 आठवडे उलटून गेले होते.

पोलिसांनी पुढे असे म्हटले की, डॉ. पाटील याने 4 लाखांपैकी 2.5 लाख स्वत:ला ठेवले होत. तर दोन मध्यस्थी व्यक्तींना कमिशन म्हणून प्रत्येकी 25 हजार आणि अन्य शिल्लक राहिलेली 1 लाखांची रक्कम बाळाच्या आईला दिली गेली. या प्रकरणी वाशी पोलिसांनी सर्व आरोपींना 3 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून डॉ. पाटील याने अशा प्रकारचे यापूर्वी सुद्धा काही गुन्हे केले आहेत का त्याचा तपास करत आहेत.