नाशिक: मनमाडमधील चांदवड येथे दुचाकी आणि ट्रेलरचा भीषण अपघात; आई-वडिलांसह 3 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
या अपघातामध्ये आई-वडिलांसह 3 वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. चांदवडच्या रेणुका माता मंदिराजवळ हा अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने चांदवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाडमधील चांदवडमध्ये दुचाकी आणि ट्रेलरचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये आई-वडिलांसह 3 वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. चांदवडच्या रेणुका माता मंदिराजवळ हा अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने चांदवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या रेणुका माता घाटाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेले कुटुंब नाशिकमधील जेलरोड भागातील रहिवासी आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघाच झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. सध्या पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - अभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात; पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल)
पोलिसांकडून मृतांच्या नातेवाईकांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी मृत कुटुंबियांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत. सध्या राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सरकार रस्ते अपघात थांबवण्यासाठी विविध उपक्रम राबवताना दिसते. मात्र, सरकाराला या उपक्रमात यश मिळताना दिसत नाही. 2019 मध्ये राज्यात जानेवारी ते मार्च दरम्यान तब्बल 9 हजार 96 रस्ते अपघात झाले असून या अपघातात 3 हजार 434 लोकांचा जीव गेला आहे.