नाशिक: रोविंग खेळाडू दत्तू भोकनळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; लग्नासाठी टाळाटाळ करत असल्याचा प्रेयसीचा दावा

तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, दत्तू भोकनळ व आपण (तक्रारदार महिला) डिसेंबर 2017 मध्ये आळंदी येथे विवाह केला. हा विवाह आपण दोघांनीच केला होता. बराच काळ आम्ही एकत्रही राहात होतो. आमच्या एकत्र राहण्याची दोघांच्याही घरच्यांना माहिती होती.

Dattu Bhokanal | (Photo Credit: Twitter)

भारतीय रोविंग (Rioting) क्रीडा प्रकाराचा आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आणि ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू दत्तू भोकनळ (Dattu Bhokanal) यांच्या विरोधात आडगाव पोलिस ठाणे (Adgaon Police Station) येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दत्तू भोकनळ यांच्यासोबत आपला विवाह झाला आहे, मात्र आता ते ही गोष्ट मनालायला तयार नाही, असेही या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, दत्तू भोकनळ व आपण (तक्रारदार महिला) डिसेंबर 2017 मध्ये आळंदी येथे विवाह केला. हा विवाह आपण दोघांनीच केला होता. बराच काळ आम्ही एकत्रही राहात होतो. आमच्या एकत्र राहण्याची दोघांच्याही घरच्यांना माहिती होती. दरम्यान, आम्ही पारंपरिक पद्धतीने विवाह करण्याचे ठरवले. त्यासाठी दोन वेळा विवाह कार्यालयही बूक केले. मात्र, दोन वेळा कार्यालय बुक करुनही दत्तू त्या ठिकाणी आलाच नाही. त्यांनी विवाहाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली, असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. तक्रारदार महिलाही पोलिस दलात कार्यरत असल्याचे समजते. (हेही वाचा, औरंगाबाद येथील महिला नगरसेविकेवर पुणे येथे बलात्कार, चार जणांवर गुन्हा दाखल)

दरम्यान, तक्रारदार महिला ही खोटा आरोप करते आहे. असा कुटलाही प्रकार घडला नाही. यावर आम्हाला काहीच बोलायचे नाही. जे काही बोलायचे ते आम्ही न्यायालयातच बोलू, अशी प्रतिक्रीया दत्तू भोकनळ यांच्या वकीलांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement