Nashik: नाशिक जिल्ह्यातील तब्बल 60 गावांमध्ये 10 दिवसांपासून वीज गायब; जिल्हा परिषदेने बिल न भरल्याने ग्रामस्थांसमोर अनेक अडचणी

इतके दिवस वीज नसल्याने लोकांना मोबाईल फोन चार्ज करण्यासही अडचणी येत आहे. यामुळे जणू काही त्यांचा इतर जगाशी संपर्कच तुटला आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

भारतामध्ये जेव्हा भाजपचे सरकार आले, तेव्हा देशातील प्रत्येक गावात वीज (Electricity) पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रात सध्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार, राज्यात सातत्याने विकासाचा दावा करत आहे. मात्र आता समोर आलेली बातमी पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल 60 गावांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, कारण या गावांमध्ये गेल्या 10-12 दिवसांपासून वीज नाही. यामुळे महाविकास आघाडी सरकारचे दावे फोल ठरत आहेत की काय अशी शंका वाटू लागली आहे.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना बेलगोडा गावचे सरपंच संजय गंगोदे म्हणाले, 'गेल्या 10-12 दिवसांपासून या भागातील 60 गावांमध्ये वीज नाही. यामुळे ग्रामस्थांना बऱ्याच समस्या भेडसावत आहेत. रात्री अंधारामुळे वन्य प्राणी ग्रामस्थांवर हल्ला करीत आहेत. वीज परत मिळावी यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे.' ही गावे डोंगरावर दाट जंगलांमध्ये वसलेली आहेत. रात्रीच्या अंधारामुळे इथल्या निवासी भागात अनेक वन्य प्राण्यांची उपस्थिती वाढली आहे, जी ग्रामस्थांसाठी एक चिंतेची बाब आहे.

आणखी एका ग्रामस्थाने सांगितले की, ‘वीज कपातीमागील कारण म्हणजे जिल्हा परिषदेचे वीज बिल न भरले हे आहे.’ इतके दिवस वीज नसल्याने लोकांना मोबाईल फोन चार्ज करण्यासही अडचणी येत आहे. यामुळे जणू काही त्यांचा इतर जगाशी संपर्कच तुटला आहे. (हेही वाचा: Coronavirus In Beed: एकाच चितेवर आठ कोरोना रुग्णांचे अंत्यसंस्कार, बीड जिल्हयातील COVID 19 स्थिती)

दुसरीकडे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रिडींग पाठवून व देयके भरून ‘महावितरण’ला सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी केले आहे. कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रिडींग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अॅपद्वारे रिडींग पाठविले तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif