काल धुळ्यात आज नांदेड मध्ये आढळल्या रिक्षात 25 तलवारी; एकाला अटक
शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे.
महाराष्ट्रात धुळे (Dhule) मध्ये काल 90 तलवारी आणि कट्यार सह चार जणांना अटक केल्यानंतर आज नांदेडमध्येही (Nanded) अशाचप्रकारची पोलिसांनी कारवाई केली आहे. आज नांदेडमध्ये पोलिसांनी 25 तलवारी जप्त केल्या आहेत. एका रिक्षा मधून पोलिसांनी 25 तलवारी जप्त केल्या आहेत. नांदेड मध्ये सापडलेल्या हत्यारांच्या प्रकरणामध्ये एकाला अटक केली आहे.
नांदेड मध्ये रिक्षामधून या तलवारी घेऊन जात होते. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांना नांदेड मधून गोकुळनगर भागात अशाप्रकारे तलवारी घेऊन जात असयाची माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत रिक्षा तपासली. या रिक्षामध्ये 25 तलवारी आढळल्या आहेत. हे देखील नक्की वाचा: Dhule: नंग्या तलवारींसह चौघांना अटक, इतका मोठा शस्त्रसाठा कशासाठी? धुळे पोलीस चक्रावले .
पकडलेल्या आरोपीने पंजाब मधून या तलवारी आल्याचं कबुल केले आहे तसेच या तलवारी विकण्याचा मानस असल्याचंही म्हटलं आहे. काल देखील धुळ्यात मोठ्या स्वरूपात तलवारी आणि कट्यार आढळल्यानंतर शहरात खळबळ माजली होती. हा प्रकार नेमका कोणत्या उद्देशाने केला आहे याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.