Nagpur: नागपूर येथे महत्वाच्या ठिकाणी 31 मार्च पर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी

नागपूर जिल्हा प्रशासनाकडून शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव येत्या 31 मार्च पर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Wikimedia Commons (Representational Photo)

Nagpur: नागपूर जिल्हा प्रशासनाकडून शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव येत्या 31 मार्च पर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार दीक्षांतभुमी, आरएसएस मुख्यालय, विमानतळ, वायूसेना मेंन्टेनन्स कमांड मुख्यालयाच्या परिसरासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 2 किमी अंतरावर ड्रोन उडवण्यास बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Uddhav Thackeray घेणार Telangana CM K Chandrashekar Rao यांची भेट, 2024 निवडणूकांसाठी भाजपा विरूद्ध विरोधक एकत्र येण्याचे संजय राऊत यांच्याकडून संकेत)

नागपूरातील महत्वाची ठिकाणे ही दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रोन उडवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या आदेशाचे पालन करण्यात यावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (OBC Reservation: ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी; अजित पवार यांची माहिती)

दरम्यान, 10 जानेवारीला डॉ. हेडगेवार स्मृती भवनाच्या परिसरात आत्मघाती हल्ला केला जाणार असल्याची माहिती मिळाली होती.  जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून हा हल्ला केला जाणार असल्याचे कळले होते. त्याचसोबत परिसराची रेकी सुद्धा केली गेली होती. या संदर्भातील आरोपी आणि दहशतवादी संघटनेचा हस्तक अहमद शेख याला अटक करण्यात आली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement