Nagar Panchayat Election Result 2022: ओबीसी आरक्षणाविना पार पडलेल्या नगरपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांचे आज निकाल; राज्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या या पहिल्याच निवडणुका आहेत.

Election 2021 in Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यात पार पडलेल्या नगरपंचायत, जिल्हा परिषदा (Zilla Parishad Elections Result) आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणूक मतदानाची मतमोजणी (Nagar Panchayat Election Result) आज (19 जानेवारी) पार पडत आहे. राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या या पहिल्याच निवडणुका आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच दिग्गजांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. एकूण 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी आणि सुमारे 195 ग्रापपंचायतीमधील 209 तसेच भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या23 व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठी निवडणुका लागल्या. त्यासाठी काल 18) जानेवारी मतदान पार पडले. या सर्व मतदानाची मतमोजणी आज पार पडते आहे. त्यासाठी आज सकाळी 10 वाजलेपासून मतमोजणी सुरु होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले आणि अनेकांना धक्का बसला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 106 नगरपंचायतींमधील ओबीसी प्रवर्गातील राखीव जागांसाठी एकूण निवडणूक प्रक्रियाच स्थगित करण्यात आली होती. आता ज्या ठिकाणी निवडणुका पार पडत आहेत त्या सर्व जागा खुल्या गटातील समजल्या जातील. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने 27% जागा खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आल्या होत्या. 21 डिसेंबरला झालेले मतदान आणि आज होणारे मतदान या सर्व मतदानांची मतमोजणी आज म्हणजेच 19 जानेवारी रोजी पार पडत आहे. (हेही वाचा, Nagar Panchayat Election 2022: तीस जिल्ह्यांतील 93 नगरपंचायतींसह भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान)

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मतांच्या समिकरणात याचे पडसाद कसे पडतात याकडे या निवडणुक निकालांमुळे लक्ष लागणार आहे. सर्वच राजकीय पक्षांसह त्या त्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांही प्रिष्ठाही या वेळी पणाला लागली आहे. कारण, सर्वच जण आरक्षणाच्या समर्थनार्थ भूमिका घेताना दिसून आहे. असे असले तरी जनतेच्या मनात नेमके काय आहे हे या निकालाने स्पष्ट होणार आहे