Cyber Fraud Mumbai: मुंबई येथील 78 वर्षीय महिलेची सायबर फसवणूक; Digital Arrest द्वारे 1.5 कोटी रुपयांना गंडा
Cyber Crime Awareness: मुंबईतील एका 78 वर्षीय महिलेला सायबर फसवणुकीत 1.5 कोटी रुपये गमवावे लागले. घोटाळेबाजांनी पोलिस अधिकाऱ्यांनी तिला मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या आरोपांची धमकी दिली. डिजिटल अरेस्ट प्रकारातील या फसवणुकीबाबत घ्या जाणून.
Money Laundering Scam: सायबर फसवणूक (Mumbai Cyber Fraud) प्रकाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. खास करुन मुंबई शहरामध्ये. शहरातील दक्षिण परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका 78 वर्षीय गृहिणी नुकतीच एका अत्याधुनिक सायबर फसवणुकीची बळी ठरली. ज्यामध्ये सायबर गुन्हेगारांनी तिला आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवले आणि तोतयागिरी केली. त्यांनी या महिलेस गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल 1.5 कोटी रुपये लाटले. पीडिता ही शहरातील नामांकित बिल्डरची मेहुणी आहे. डिजिटल अटक (Digital Arrest) वाटाव्या अशा या प्रकरणात तिला पाठिमागील अनेक दिवसांपासून फसवले जात होते. ज्यामध्ये ती अनभिज्ञपणे पैसे हस्तांतरीत करत राहिली.
सवले गेले.
कशी घडली फसवणूक?
पीडितेने अमेरिकेत तिच्या मुलीला खाद्यपदार्थ पाठवण्यासाठी 5 डिसेंबर रोजी कुरिअर सेवेचा वापर केला. दुसऱ्या दिवशी, तिला "अमित कुमार" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीचा कॉल आला, ज्याने कुरिअर कंपनीत काम करण्याचा दावा केला होता. कुमारने आरोप केला की तिच्या पार्सलमध्ये कालबाह्य झालेले पासपोर्ट, आधार कार्ड, SBI क्रेडिट कार्ड, 2000 mg MDMA औषधे आणि $2,000 रोख यासह संशयास्पद वस्तू आहेत. सदर व्यक्तीचा दावा पाहून वृद्ध असलेली पीडित महिला गोंधळून गेली. त्याचाच फायदा घेऊन सायबर फसवणूक करणाऱ्यांनी तिच्यावर मनी लाँड्रिंग (Money Laundering Scam) प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आणि तिला ती कटकारस्थान करत असल्याचे सांगून या प्रकरणात (खोट्या) गोवले. नंतर तिच्या मोबाईलवर डिजिटल अटक प्रकरणात येतात तसे अनेक फोन कॉल्स आले. ज्यामध्ये पलीकडील लोक सायबर गुन्हे शाखा, वित्त विभाग आणि दिल्ली विशेष पोलिसांच्या विशेष तपास पथकातील अधिकारी म्हणून इतर व्यक्तींनी तिला कायदेशीर कारवाई आणि अटक करण्याची धमकी देत होते. (हेही वाचा, Goregaon Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात ज्येष्ठ नागरिकांची 1.33 कोटींची फसवणूक; मुंबई येथील गोरेगाव परिसरातील घटना)
अत्याधुनिक फसवणूक
पीडित वृद्ध महिलेस कारवाई खरी वाटावी यासाठी घोटाळेबाजांनी व्हिडिओ कॉल केले, ज्या दरम्यान ते गणवेशधारी अधिकारी म्हणून दिसले आणि त्यांनी तिला व्हॉट्सॲपवर बनावट वॉरंट आणि तपास अहवाल दाखवले. पीडितेला संवेदनशील बँकिंग माहिती सामायिक करण्यासाठी आणि तिची मालमत्ता "सुरक्षित" करणे आवश्यक आहे असा विश्वास ठेवून फसवणूक करणाऱ्यांनी प्रदान केलेल्या एकाधिक खात्यांमध्ये ₹1.51 कोटी हस्तांतरित करण्यास भाग पाडले गेले. (हेही वाचा, How to Protect Yourself from Cyber Fraud: सायबर फसवणूक आणि गुन्हेगारांपासून कसे कराल स्वतःचे संरक्षण? जाणून घ्या खास टीप्स)
मदत, शोध आणि पोलिस तक्रार
दरम्यान, महिलेने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची जवळच्या नातेवाईकाजवळ वाच्यता केली. त्यानंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. तिने लगेच सायबर क्राइम पोलिस हेल्पलाइन (1930) शी संपर्क साधला आणि प्रकरण मुंबई पोलिसांच्या दक्षिण सायबर सेलकडे वर्ग करण्यात आले. (हेही वाचा, Mumbai Tops Cybercrime Complaints: सायबर क्राईम घटनांमध्ये मुंबई अव्वल; जाणून घ्या तक्रारींची संख्या आणि पोलीस कारवाई)
एका अधिकाऱ्याने सांगितले की, फसवणूक करणाऱ्यांनी अनेक बँक खात्यांचा वापर करून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे वळते केले. ज्यामुळे रक्कम वेगाने हस्तांतरीत झाली. सायबर क्राईम तज्ञांनी नागरिकांना, विशेषत: वृद्ध व्यक्तींनी असे कॉल प्राप्त करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
सत्यता सत्यापित करा: अनोळखी कॉलर्सनी केलेले दावे नेहमी दोनदा तपासा.
संवेदनशील माहिती शेअर करणे टाळा: फोनवर वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील उघड करू नका.
संशयास्पद गतिविधीची तक्रार करा: तुम्हाला फसवणूक झाल्याचा संशय असल्यास सायबर क्राईम हेल्पलाइन किंवा स्थानिक पोलिसांशी त्वरित संपर्क साधा.
दरम्यान, तक्रार प्राप्त होताच, मुंबई सायबर सेल विभागाने गुन्हा दाखल करुन तापस सुरु केला आहे. पोलीसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र, नागरिकांनीही अशा घटना टाळण्यासाठी काळजीपूर्वक पावले टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी डिजिटल साक्षर होण्यावर नागरिकांनी भर द्यावा, असेही पोलीस सांगतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)