Mumbai Shocker: मुंबईतील महिलेने मागितला मृत वडिलांचा PF; HR मॅनेजरने केली सेक्सची मागणी, काय आहे प्रकरण? वाचा

कारण, तिच्या वडिलांनी तिची वारस म्हणून नोंद केली होती. जेव्हा ती महिला 18 वर्षांची झाली तेव्हा तिने वांद्रे येथील ईपीएफ कार्यालयात जाऊन तिच्या वडिलांच्या ईपीएफ पैशासाठी दावा करण्यासाठी एक फॉर्म भरला. ती जवळपास पाच वर्षे ईपीएफ कार्यालयात येत राहिली.

Abuse | File Image

Mumbai Shocker: खेरवाडी पोलिसांनी दक्षिण मुंबईतील एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे. त्याच्यावर एका महिलेला अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी HR मेनेजरने महिलेच्या मृत वडिलांच्या पेन्शन फंड (EPF) भरण्याच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या आरोपी फरार आहे. मात्र, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 24 वर्षीय महिला, जी अल्प उत्पन्न कुटुंबातील आहे. ती 19 वर्षांचा धाकटा भाऊ आणि 75 वर्षांची आजी यांच्यासोबत राहते. घटस्फोटानंतर पीडितेची आई फार पूर्वीच कुटुंबापासून विभक्त झाली होती. पीडितेचे वडील 2009 ते 2015 या काळात माझगाव येथील एका कंपनीत काम करत होते. 2015 मध्ये त्यांचे निधन झाले. तेव्हा तक्रारदार महिलेचे वय 15 वर्षे होते. (हेही वाचा -Palghar Crime: प्रॉपर्टीवरून दोघांमध्ये वाद, लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या, दोघांना अटक)

पोलिसांनी सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर, 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना उर्वरित ईपीएफची रक्कम मिळणार होती. कारण, तिच्या वडिलांनी तिची वारस म्हणून नोंद केली होती. जेव्हा ती महिला 18 वर्षांची झाली तेव्हा तिने वांद्रे येथील ईपीएफ कार्यालयात जाऊन तिच्या वडिलांच्या ईपीएफ पैशासाठी दावा करण्यासाठी एक फॉर्म भरला. ती जवळपास पाच वर्षे ईपीएफ कार्यालयात येत राहिली. पण तिला तिची थकबाकी मिळाली नाही. (हेही वाचा - ( हेही वाचा- फुड डिलीव्हरी बॉयने घरात घुसून तरुणीसोबत केले असे काही; बेंगळूरू येथील धक्कादायक घटना)

फेब्रुवारी 2023 मध्ये, EPF अधिकाऱ्यांनी त्याला कळवले की, त्याच्या वडिलांची EPF फाईल सुशांत सर नावाच्या त्यांच्या नियोक्त्याच्या व्यवस्थापकाकडे पाठवली आहे. त्यानंतर महिलेला 45 दिवसांत EPF मिळेल, असं सांगण्यात आलं. पीडितेने सुशांतशी संपर्क साधला.

पीडितेने आरोप केला आहे की, सुशांतने तिला तिच्या वडिलांचा ईपीएफ मिळविण्यात मदत करीन असे सांगितले आणि मजकूर संदेशाद्वारे माझ्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्याने पुन्हा अश्लील मेसेज पाठवून शारीरिक संबंधांची मागणी केली. त्यानंतर महिलेने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.