Palghar Crime: प्रॉपर्टीवरून दोघांमध्ये वाद, लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या, दोघांना अटक

प्रॉपर्टीसाठी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पालघर जिल्हा हादरला आहे.

Palghar Crime: प्रॉपर्टीवरून दोघांमध्ये वाद, लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या, दोघांना अटक
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Live in Partner Murder Case: प्रॉपर्टीसाठी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पालघर जिल्हा हादरला आहे. प्रेयसी लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी बळजबरी करत होती.याच गोष्टीचा राग मनात धरत प्रियकराने प्रेयसीची गळा चिरून हत्या केली आहे. ही घटना शहरातील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागीत आठवड्यात घडली आहे.( हेही वाचा- फुड डिलीव्हरी बॉयने घरात घुसून तरुणीसोबत केले असे काही; बेंगळूरू येथील धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका तरुणीचे शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता.या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच, पोलिस याच प्रकरणी तपास करत होते. या प्रकरणी पोलिसांना काही पुरावे सापडले आणि त्यानंतर आरोपीचा देखील शोध लावला. सुनील असं आरोपीचे नाव आहे. सुनील काही वर्षांपासून एका तरुणीच्या प्रेमात होता. मात्र, तरुणी सुनीलला वारंवार लग्न करून प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्याची जबरदस्ती करत होता. बराच दिवसांपासून तरुणी सुनीलाल छळत होती

हीच गोष्टी सुनीलाल सतत सतवत राहिली. वैतागून त्याने तरुणीला ठार करायचे ठरवले. मित्राच्या मदतीने तरुणीचा खून करण्याची प्लॅनिंग केले. त्यानंतर सुनीलने त्याला लोणावळ्याला फिरण्यासाठी जाऊ असं सांगितले.दोघे जण कारने तरुणीला घेऊन गेले. सुनीलने मित्र महेश बडगुजरच्या मदतीने तरुणीचा निर्घृण हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिचं मुंडकं शरिरापासून वेगळे केले. मृतदेह नदीत फेकून दोघेही घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर अज्ञातांवर 302 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनीया प्रकरणी शोध आरोपींना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाला. आरोपींनी पोलिसांत गुन्हा कबुल केला. या घटनेनंतर पालघर परिसरात खळबळ उडाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2024 12:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).