Mumbai Weather Forecast: मुंबईत पाऊस; शहरात मान्सून पूर्व सरी बरसण्याच्या पार्श्वभूमीवर पहा कसे असेल उद्याचे हवामान!

मुंबई च्या अनेक भागामध्ये आज सकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Mumbai Weather Forecast: मुंबईत पाऊस; शहरात मान्सून पूर्व सरी बरसण्याच्या पार्श्वभूमीवर पहा कसे असेल उद्याचे हवामान!
Mumbai Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

मुंबईकर उन्हाच्या काहिलीने हैराण असताना आता पाऊस कधी पडणार? याची उत्सुकता त्यांना लागली आहे. आज सकाळी राज्यात काही ठिकाणी मान्सून पूर्व सरी बसरल्यानंतर आता राज्याच्या उंबरवठ्यावर मान्सून आल्याचे संकेत मिळत आहे. मुंबईत पाऊस 5, 6 जून दरम्यान येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे उद्याचे हवामान देखील ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. हलका पाऊस, सोबत मेघा गर्जना होण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि आजुबाजूच्या भागात आठवड्याच्या शेवटापर्यंत पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस शहरात तात्पुरता नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा देत असल्याचं चित्र आहे. नक्की वाचा: Mumbai Rain Update: मान्सून पूर्व पावसाची हजेरी, दादर आणि लगतच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज .

मुंबई मध्ये पाऊस कधी येणार? पहा उद्याचा हवामान अंदाज  

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2024 10:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).