Mumbai Weather Forecast: मुंबई मध्ये आज Yellow Alert; ठाणे, रायगड, पालघर मध्येही पाऊस बरसण्याची शक्यता
हवामान खात्याने आज (20 ऑक्टोबर) राज्यांत मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad) जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे.
एकीकडे कोरोना वायरसचा (Coronavirus) सामना करणार्या महाराष्ट्राला आता अवकाळी पाऊस झोडपून काढत असल्याने दुहेरी संकट समोर उभं ठाकलं आहे. हवामान खात्याने आज (20 ऑक्टोबर) राज्यांत मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad) जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. आजही मुंबईत वीजांच्या कडकडाटासह (Lightning ) मुसळधार पावसाची (Thunderstorms) शक्यता आहे. मुंबईसाठी केवळ आजचा दिवस अलर्टचा असला तरीही ठाणे, पालघर आणि रायगड मध्ये उद्या, परवा तेरवा म्हणजेच शुक्रवार (23 ऑक्टोबर) पर्यंत अलर्ट कायम असेल.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता मध्य भारत, महराष्ट्राचा काही भाग तसेच पश्चिम किनारपट्टीला त्याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. कोकणातही येत्या काही दिवसांत अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 ऑक्टोबर पाऊस या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावरही पावसाचे ढग जमा होण्यास सुरूवात झाली आहे. Maharashtra Heavy Rains Update: महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा, 'या' तारखेला मेघगर्जनेसह राज्यात पाऊस बरसण्याची शक्यता.
महाराष्ट्रामध्ये काल पुण्यात पाऊस बरसला आहे. त्यामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. तर महाराष्ट्रात मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद येथे देखील पावसाचा जोर मागील आठवड्यात जोरदार असल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. यामुळे मका, सोयाबीन, भात शेती यासोबतच फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांचं हाता-तोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट झालं आहे.
सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एनसीपी अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच अनेक राज्यांचे पालकमंत्री, महाविकास आघाडीचे मंत्री ठिकठिकाणी पहाणी दौरा करत आहेत.