Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये एप्रिल 24 पर्यंत शहरभर 5% पाणी कपात
सध्या बीएमसी कडून मान्सून पूर्व देखभालीचं काम सुरू आहे यामध्ये या टॅंकची स्वच्छता देखील केली जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून ( BMC) शहरामध्ये 24 एप्रिल 2024 पर्यंत सर्वत्र 5% पाणी कपात जाहीर केली आहे. भांडूप कॉम्प्लेक्स च्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट ( Bhandup water treatment plant) मध्ये देखभालीचं काम हाती घेतलं जाणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत मुंबईला होणार्या पाणीपुरवठ्या मध्ये 5% कपातीचा निर्णय झाला आहे. Bhandup complex मधून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. हा वॉटर ट्रीटमेंट प्लांट आशिया मधील सर्वात मोठा प्लांट आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये 1910 मिलियन लिटर आणि 900 मिलियन लीटर असे दोन वॉटर ट्रीटमेंट युनिट्स बसवण्यात आले आहेत.
बीएमसीच्या रिलीज नुसार, 900 मिलियन लीटर क्षमतेच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट द्वारा रोजचे 990 मिलियन लीटर पाणी ट्रीट केले जाते. सध्या बीएमसी कडून मान्सून पूर्व देखभालीचं काम सुरू आहे यामध्ये या टॅंकची स्वच्छता देखील केली जाणार आहे. Mumbai Water Level Updates: मुंबई मध्ये 7 तलावात मिळून मागील 3 वर्षातील निच्चांकी केवळ 37.9% पाणीसाठा.
मुंबई मध्ये उन्हाळा तीव्र होत असताना अअता सातही तलावांमधील पाणीसाठा तळ गाठत आहे. मागील 3 वर्षांतील निच्चांकी पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. अशातच नागरिकांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना आहे. पाणीसाठा तळ गाठत असला तरीही त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपात यंदा लादण्यात आलेली नाही. वैतरणा आणि भातसा मध्ये पालिकेला राज्य सरकारच्या साठ्यातून अतिरिक्त पाणी पुरवठा केला जाणार आहे.
Pise Water Pumping Station मध्ये आग लागल्याने काही दिवसांपूर्वी शहरात 15% पाणी कपात होती. ट्रान्सफार्मर कार्यान्वित करण्यासाठी पालिकेने ही पाणी कपात जाहीर केली होती. 5 मार्च पर्यंत शहरात पाणी कपात होती.