Water Cut in Mumbai: मुंबईतील परळ, अंधेरी परिसरात दोन दिवस पाणीकपात

महापालिकेने पुढच्या काही तासांसाठी मुंबईतील काही भागांमध्ये संपूर्ण पाणी कापत (Water Cut in Mumbai) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच 5 आणि 6 ऑक्टोबर या काळात पाणीपूरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

मुंबई शहरातील काही भागांमध्ये पुढचे काही तास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेने पुढच्या काही तासांसाठी मुंबईतील काही भागांमध्ये संपूर्ण पाणी कापत (Water Cut in Mumbai) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच 5 आणि 6 ऑक्टोबर या काळात पाणीपूरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत व्हावा यासाठी या कालावधीत काही तांत्रिक कामं हाती घेण्यात येणार आहेत. प्रामुख्याने दक्षिण प्रभागातील परळ (Parel ) , काळेवाडी, नायगाव या भागात ही कामे होणार आहेत. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा खंडीत होणार आहे. मुंबईच्या के-वेस्ट आणि के-ईस्ट वॉर्डच्या अनेक भागात दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होईल. त्यामुळे अंधेरीच्या (Andheri) अनेक भागांमध्ये 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा खंडित होईल.

कोणत्या परिसरात कधी नसेल पाणी?

मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर या दिवशी सकाळी 10 ते बुधवारी (6 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजेपर्यंत पारणी कपात असणार आहे. ही पाणीकपात मुंबईतील परळ भागात असणार आहे. या बागात 24 तास पाणीकपात असेल.

पाणी कपातीचे कारण काय?

पाणीकपातीचे कारण देताना महापालिकेने म्हटले आहे की, मुंबईतील शहरातील गोलंजी टेकडी जलायश परिसरात 750 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 450 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहनीची जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे एफ दक्षिण विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या 450 मिलीमीटर व्यासाच्या दोन जलवाहिण्या काढून टाकण्यात येतील.परिणामी या भागातील पाणीपुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

दरम्यान, पाणीकपात दीर्घकाळ चालणार असल्याने मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे. ज्यामुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेकदा पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागतो, असेही पालिकेने म्हटले आहे.