मुंबई: वडाळा येथील एकाच पोलीस स्थानकातील 9 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
त्यामुळे लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. मात्र काही नागरिकांकडून लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. मात्र काही नागरिकांकडून लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. डॉक्टरांसारखेच कार्य पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी तीन पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर 55 वया पेक्षा अधिक वयोगटातील पोलीस कर्मचारी कोरोनाच्या परिस्थितीत काम करणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता वडाळा येथील एकाच पोलीस स्थानकातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
वडाळा पोलीस स्थानकाचे सिनियर इन्स्पेक्टर शहाजी शिंदे यांनी सांगितले की, 9 पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांना गुरु नानक रुग्णालय, केईएम हॉस्पिटल आणि बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामधील काही जण 50 पेक्षा अधिक वयोगटातील आहे. कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.(Coronavirus: मुंबईत 50 टक्के झोपडपट्ट्यांसह Containment Zone चा आकडा 1 हजाराच्या पार)
दरम्यान, वडाळा पूर्व मधील कोरबा मिथ अगर झोपडपट्टीतील जवळजवळ 12 जणांना कोरोना संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या सर्वांचे कोरोनाची रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 106 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर तीन जणांना मृत्यू झाला आहे. राज्य सरकारकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एकाला सरकारी नोकरी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.