Mumbai: खार येथील पब मधील महिला व्यवस्थापकाचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांना अटक

या प्रकरणी आरोपींच्या विरोधात आयपीएसच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Representative image

Mumbai:  खार येथील एका पब मधील महिला व्यवस्थापकाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात आयपीएसच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी तिचा कथितपणे पाठलाग केला आणि तिच्यावर अयोग्य कमेंट्स केल्या.(Theft: मुंबईत पार्सलमधून मौल्यवान वस्तू चोरल्याप्रकरणी कुरिअर फर्मच्या कर्मचाऱ्यासह तिघांना अटक)

पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, त्या दोघांनी तिचा 23 जानेवारीपासून छळ करण्यास सुरुवात केली आणि ते ती गोष्ट सर्वत्रच करत होते. यामुळे खुप मनस्ताप झाल्याचे महिलेने म्हटले आहे. तर प्रमुख आरोपीने तिच्याकडे तिचा मोबाईल क्रमांक मागितला आणि तिला एका पार्टीसाठी सुद्धा बोलावले. पण ती गेली नाही.(Mumbai: अभ्यासाच्या दडपणाखाली तरुणी दिल्लीहून घर सोडून महाराष्ट्रात पोहोचली, रिक्षाचालकाच्या समजूतदारपणामुळे तरुणी कुटुंबाकडे सुखरुप)

तर 27 जानेवारीला आरोपीने त्याच्या मित्रासोबत तिचे लैंगिक शोषण केले. त्यांच्या या जाचाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून गणेश आणि हरिश अशी आरोपींची नावे आहेत.