Bhatsa Dam मध्ये तांत्रिक बिघाड; मुंबई मध्ये 15% पाणी कपात, ठाण्यात कमी दाबाने पाणी

मुंबई प्रमाणे ठाण्यातही पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.ठाणे मनपा कडून पुढील 2 दिवस मनपा क्षेत्रात कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) शहराला पाणीपुरवठा करणारे भातसा धरणामध्ये (Bhatsa Dam) काही तांत्रिक बिघाड झाल्याने आता नागरिकांना 15% पाणीकपातीला सामोरं जावं लागणार आहे. भातसा धरणामध्ये 15 मेगावॅट पॉवर स्टेशन मध्ये हा बिघाड झाला आहे.

टाईम्स ऑफ इंडिया च्या रिपोर्ट नुसार, मुंबई महानगरपालिकेने शहराला 15% पाणीकपातीला सामोरं जावं लागत असल्याचं जाहीर केले आहे. बीएमसीच्या माहितीनुसार, मुंबई शहराला भातसा धरणामधून दिवसाला 2000 मिलियन लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. 22 फेब्रुवारीला 15 मेगावॉल्ट पॉवर प्लांट मध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे मुंबईकरांच्या पाणीपुरवठयावर परिणाम होणार आहे. 40% पाणी कमी झाल्याने मुंबईला हा बिघाड दुरूस्त होईपर्यंत 15% पाणीकपातीला सामोरं जावं लागत आहे. नक्की वाचा: IMD कडून उन्हाळी दीर्घकालीन पूर्वानुमान जाहीर; पहा कसा असेल यंदाचा उन्हाळा .

मुंबई प्रमाणे ठाण्यातही पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.ठाणे मनपा कडून पुढील 2 दिवस मनपा क्षेत्रात कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचीतसेच पुरेसा पाणी साठा करण्याची गरज आहे.