सुजय विखे 12 मार्च रोजी भाजप पक्षात प्रवेश करणार
विधानसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा मुलगा सुजय विखे (Sujay Vikhe) आता भाजप (BJP) पक्षात प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा मुलगा सुजय विखे (Sujay Vikhe) आता भाजप (BJP) पक्षात प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी दादर येथील वसंत स्मृती येथे सुजय विखे भाजप पक्षासोबत हात मिळवणी करणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा रविवारी निवडणुक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांतर करण्यासाठी घौडदौड सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर आता सुजय विखे भाजपात प्रवेश करणार असल्याचे ठरले आहे. तत्पूर्वी सुजय विखे येत्या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून निवडणुक लढवणार असल्याचा संभ्रम निर्माण झाला होता. पण अखेर आता भाजपमध्येच प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी गिरिश महाजन यांची उपस्थिती फार महत्वाची ठरणार आहे.(हेही वाचा-मनसे पक्षाचे एकमेव आमदार शरद सोनावणे आज शिवसेनेत प्रवेश करणार)
भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी सुजय विखे प्रयत्न करत होते. तर नुकतीच गिरिश महाजन आणि सुजय विखे यांच्यातील झालेल्या बैठकीत सुजय विखे आता भाजपमध्ये आपले पाऊल टाकणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुक महाराष्ट्रात चार टप्प्यामध्ये होणार असल्याचे निवडणुक आयोगाने काल सांगितले आहे.