मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: राहुल शेवाळे विरूद्ध एकनाथ गायकवाड यांच्यात चुरशीची लढत; पुन्हा खासदार पदाकडे कोण करतयं कूच?

शिवसेनेच्या राहुल शेवाळे आणि कॉंग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्यामध्ये या मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळाली आहे.

Lok Sabha Elections 2019 | (Photo Credits: ANI/Twitter)

Eknath Gaikwad vs Rahul Shewale:  लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections)साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. शिवसेनेच्या राहुल शेवाळे आणि कॉंग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्यामध्ये या मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळाली आहे.  एका क्लिकवर पहा काय आहेत महाराष्ट्र सह भारत देशात काय आहेत निकाल?

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

दादर, सायन, धारावी, माटुंगा, वरळी या मराठमोळ्या भागांचा या मतदारसंघांमध्ये समावेश आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प या मतदारसंघांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मनसेने या मतदारसंघात एकनाथ गायकवाड यांच्यासाठी प्रचार केल्याने आता या हायप्रोफाईल मतदारसंघात खासदार पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरलं आहे.  Maharashtra Lok Sabha Elections 2019 Exit Poll Results : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल अंदाज इथे पाहा सविस्तर

11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यात लोकसभा निवडणूक मतदान पार पडले. यंदाचे एक्झिट पोल एनडीएच्या बाजुने आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मतमोजणीकडे उमेदवारांसोबतच मतदारांचे लक्ष लागले आहे.