Mumbai Shree 2019 Winner: अभिनंदन! अनिल बिलावा ठरला 'मुंबई श्री', डॉ. मंजिरी भावसार हिने पटकावले 'मिस मुंबई' पद
यावेळच्या मुंबई श्री पदाचा मानकरी अनिल बिलावा ठरला असून डॉ. मंजिरी भावसार हिने 'मिस मुंबई'(Miss Mumbai)चे पद जिंकले आहे.
Mumbai Shree 2019 Winner: मुंबई मधील अत्यंत महत्वपूर्ण आणि कौशल्यपूर्ण अशा 'मुंबई श्री' (Mumbai Shree) च्या खेळाला येत्या 17 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली होती. तर शरीरसौष्ठव पटूंचा यंदाचा खेळ हा भव्यदिव्य नव्हेच तर अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांचे मन जिंकणारा ठरला. यावेळच्या मुंबई श्री पदाचा मानकरी अनिल बिलावा ठरला असून डॉ. मंजिरी भावसार हिने 'मिस मुंबई'(Miss Mumbai)चे पद जिंकले आहे.
लोअर परळ येथे यंदाच्या मुंबई श्रीचे आयोजन करण्यात आले होते. तर शरीरसौष्ठवपटू अनिल बिलावा हा नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठवपटू पदाचा मानकरी ठरला आहे. यापूर्वी बिलावा याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नव्हते. मात्र बिलावा याने विजेत्यांवर मात करत हा मानाचा किताब पटकावला आहे. त्याचसोबत गेल्या वर्षात मिस मुंबईचे पद वर आपले नाव कोरण्यात अयशस्वी झालेल्या पीळदार सौंदर्यवतींमध्ये डॉ. मंजिरी भावसार हिने त्याचा मान यंदाच्या वर्षी पटकावला आहे.(हेही वाचा-Mumbai Shree 2019: शरीरसौष्ठव पटूंचा चित्तथरारक खेळ रंगणार, येत्या 17 फेब्रुवारी पासून 'मुंबई श्री'ला सुरुवात)
तर दृष्ट लागण्याजोगे करण्यात आलेले आयोजन आणि शरीरसौष्ठव पटूंची पीळदार शरीरयष्टी यावेळी पाहायला मिळते. तर गेल्या वर्षी 20 फेब्रुावारी 2018 रोजी पार पडलेल्या मुंबई श्रीच्या खेळात 85 किलो वजनी गटातील सुजल पिळणकर ह्याला 'मुंबई श्री'च्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2019 06:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

