Mumbai Shocker: हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी हादरली मुंबई

मुंबई शहरात आज अ‍ॅन्टॉप हिल (Antop Hill) आणि लालबाग (Lalbaug) भागामध्ये दोन हत्येच्या घटना समोर आल्या आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबई शहरात आज अ‍ॅन्टॉप हिल (Antop Hill) आणि लालबाग (Lalbaug)  भागामध्ये दोन हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) या दोन्ही हत्येच्या घटनेची दखल घेण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. दरम्यान अ‍ॅन्टॉप हिल परिसरामध्ये हत्येनंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला तर लालबाग मध्ये लहान भावाचाच खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालबाग मध्ये चिवडा गल्ली मध्ये लहान भावाचा खून करण्यात आला आहे. त्यामध्ये कलम 302 अंतर्गत आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. न्यूज 18 लोकमत च्या माहितीनुसार, आरोपीचं नाव अशोक भरूगडे आहे. हा 30 वर्षीय आरोपी असून त्याच्या मित्रांसोबत लहान भावाचे भांडण झाले आणि रागाच्या भरात चाकू खुपसून अशोकने सख्या लहान भावाचा जीव घेतला. नक्की वाचा: New Mumbai CP: मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून संजय पांडे यांची नियुक्ती.

ANI TWEET

मुंबईत दुसरी हत्येची घटना अ‍ॅन्टॉप हिल परिसरातील आहे. अ‍ॅन्टॉपहिल मध्ये एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुंबई पोलिस सध्या या प्रकरणी अधिक तपास करत आहे. पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ANI Tweet

काही दिवसांपूर्वीच  शुल्लक कारणांवरुन माटुंग्यामध्ये 22 वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामध्ये  भाजीविक्रेता अटकेत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement