Mumbai Shocker: मुलाकडून शिवीगाळ होत असल्याने गोरेगाव मध्ये 78 वर्षीय वृद्धेने आत्महत्या करून जीवन संपवण्याचा केला प्रयत्न; Senior Citizens Act खाली FIR दाखल
घरांमध्ये वृद्धांवरील अत्याचारांबद्दल चिंता वाढत असताना, गोरेगाव मधील या वृद्ध महिलेच्या कुटुंबाची चौकशी सुरू आहे तर पोलिस त्यांचा तपास सुरू ठेवत आहेत.
मुंबई मध्ये 78 वर्षीय वृद्ध महिलेने पोटच्या मुलाकडून वारंवार शाब्दिक शिवीगाळीमुळे होणार्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायद्यानुसार, गोरेगाव पोलिसांनी मुलाविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मृत वृद्ध महिला तिचे 91 वर्षीय पती, दोन मुले, त्यांचे कुटुंब आणि इतर नातेवाईकांसह एका मोठ्या संयुक्त कुटुंबात राहत होती. तिचा मोठा मुलगा बेरोजगार आहे आणि तो दारूच्या व्यसनाला अधिन झाला आहे. ती आणि तिची मुलगी कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी काम करतात. पोलिस तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की ही महिलाआणि तिच्या पतीशी क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालताना तो नियमितपणे ओरडतो आणि अपशब्द वापरतो.
23 मे रोजी सकाळी, या महिलेच्या मोठ्या मुलाने तिला शिवीगाळ केली, तिच्यावर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा आरोप केला आणि तिला घराबाहेर पडण्याची मागणी केली. तिने भांडणे टाळण्याचा प्रयत्न केला आणि खूप दुखावलेल्या अवस्थेत तिची कामं सुरू ठेवली. नंतर तिने पाहुणे आल्याचे भासवत उंदीर मारण्याचे विष खरेदी करण्यासाठी तिच्या मालकाकडून 500 रुपये उसने घेतले.
25 मे दिवशी तिची मुलगी डॉक्टरकडे जाण्यासाठी बाहेर असताना वृद्ध महिला विषारी पाणी प्यायली. तिची मुलगी परत आल्यावर तिला उलट्या होऊ लागल्या आणि त्यानंतर तिला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. अतिदक्षता विभागात (ICCU) दाखल केल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू आहेत. Mumbai Suicide Case: अकरावी मधील विद्यार्थीनीची नैराश्यातून 45 व्या मजल्यावरून उडी मारून आत्माहत्या.
कुटुंबातील सदस्यांकडून वृद्धांवर अत्याचार होण्याची ही मुंबईतली दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी दहिसरमध्ये एका 73 वर्षीय वृद्धावर त्याच्या मुलाने मालमत्तेच्या वादातून हल्ला केला होता, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.
Women and Child Helpline Numbers: Childline India – 1098; Missing Child and Women – 1094; Women’s Helpline – 181; National Commission for Women Helpline – 112; National Commission for Women Helpline Against Violence – 7827170170; Police Women and Senior Citizen Helpline – 1091/1291.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)