Mumbai Suicide Case: अकरावी मधील विद्यार्थीनीची नैराश्यातून 45 व्या मजल्यावरून उडी मारून आत्माहत्या
एकदा psychiatrist सोबत बोलताना तिने, 'सार्यांना मरण अटळ आहे मग आपण का जगतोय?' असा सवाल मुलीने केला होता असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे.
विक्रोळी कन्नमवार नगर मधील आत्महत्येचं वृत्त ताजं असताना आता 17 वर्षीय तरूणीने गोरेगाव पूर्व भागात एका रहिवासी इमारतीच्या 45 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. आरे पोलिस स्टेशन मध्ये ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरूवातीच्या तपासानंतर आरे पोलिसांकडून या प्रकरणी accidental death चा गुन्हा दाखल केला आहे.
आत्महत्या केलेल्या तरूणीचं वय अवघं 17 वर्ष आहे. ती अकारावी इयत्तेमध्ये एका इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकत होती. तिच्या बॅगेमध्ये सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये तिने आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये हा निर्णय तिने स्वतः घेतला असल्याचं म्हटलं आहे.पोलिसांच्या माहितीनुसार ही किशोरवयीन मुलगी नैराश्याच्या विळख्यामध्ये होती. मागील सहा वर्ष ती नैराश्यात आहे आणि तिच्यावर उपचार सुरू होते.
मृत तरूणीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी देखील तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. एकदा psychiatrist सोबत बोलताना तिने, ' सार्यांना मरण अटळ आहे मग आपण का जगतोय?' असा सवाल केला होता. पोलिसांना अपघाती निधनाची नोंद केली आहे. पोलिसांना कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळलेली नाही.
विक्रोळीच्या कन्नमवार भागातही दोन दिवसांपूर्वी एका 25 वर्षीय तरूणीने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली होती. तरूणीचं शरीर इमारतीखाली उभ्या असलेल्या दुचाकीला आदळल्याने रस्त्यावर तिचं शरीर दोन तुकड्यांमध्ये पडल्याचं समोर आलं होतं. या आत्महत्येप्रकरणी देखील पोलिस तपास सुरू आहे.
Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers: Tele Manas (Ministry of Health)- 14416 or 1800 891 4416, NIMHANS- + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400, Peak Mind- 080-456 87786, Vandrevala Foundation- 9999 666 555, Arpita Suicide Prevention Helpline- 080-23655557, iCALL- 022-25521111 and 9152987821, COOJ Mental Health Foundation (COOJ)- 0832-2252525.
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2025 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

