Mumbai Road Accident: मद्यपी ड्रायव्हरने Bandra-Worli Sea Link वर गाडी ठोकल्याने एक महिला गंभीररित्या जखमी
असिस्टंट सब इन्स्पेकटर दिलीप सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, Kharatmal यांच्या विरूद्ध suo moto FIR दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गंभीर दुखापत, ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचे गुन्हे दाखल आहेत.
मुंबई मध्ये 30 वर्षीय वकीलाच्या डोक्याला एका रस्ते अपघातामध्ये जबररित्या जखमी झाली आहे. रविवारी रात्री Bandra-Worli Sea Link वर एका मद्यपी बीएमडब्ल्यू कार (BMW) चालकाने महिलेच्या कारवर गाडी घातल्याने आता ती महिला आयुष्याची लढाई लढत आहे. खार पश्चिमची रहिवासी Saloni Samir Lakhiya ही 30 वर्षीय पीडित महिला आहे. तिच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नक्की वाचा: Mumbai Hit And Run Case: फ्लायओव्हर वर कारने अचानक घेतलेल्या यू टर्न ने दोन बाईकस्वारांचा घेतला जीव.
Bandra-Worli Sea Link वर रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे. Lakhiya ही Celerio car ने घरी जात होती. Sachin Kharatmal हा 45 वर्षीय आरोपी असून मालाड वेस्टचा तो रहिवासी आहे. कार चालवत असताना तो नशेत असल्याचं मीडीया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.
पोलिसांनी Lakhiya यांना भाभा रूग्णालयात दाखल केले आहे. नंतर तिच्या नातेवाईकांना खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी स्थिती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आले आहे. Kharatmal यांच्या बहिणीचा हात देखील अपघातामध्ये फ्रॅक्चर झाला आहे.
असिस्टंट सब इन्स्पेकटर दिलीप सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, Kharatmal यांच्या विरूद्ध suo moto FIR दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गंभीर दुखापत, ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचे गुन्हे दाखल आहेत.
Kharatmal यांना जामीन देण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून हीट अॅन्ड रन मध्ये आरोपी पकडण्यात आला असून कार ताब्यात घेतली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)