Mumbai Rape: ऑनलाईन कामाचे आमिष दाखवून इंजिनियर मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

ऑनलाईन काम देण्याचे आमिष दाखवून मुलीवर बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

एका 24 वर्षीय इंजिनियर तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) येथून समोर येत आहे. ऑनलाईन काम देण्याचे आमिष दाखवून घरी बोलावून मुलीवर बलात्कार करण्यात आला. तसंच त्याचा व्हिडिओ बनवून पीडितेकडून तब्बल 35 लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी जफरिया खान (28) नामक तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पीडित तरुणी ही आयटी इंजिनियर असून तिचा ऑनलाईन व्यवसाय आहे. ऑनलाईन काम देतो असे सांगून आरोपीने तिला मालाड पूर्वच्या राणी सती मार्गावर असलेल्या इमारतीत बोलावले. त्यानंतर शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना मार्च 2018 मध्ये घडली. तसंच बनवलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून काम करुन वर्षभरात तिच्याकडून तब्बल 35 लाख रुपये उकळले. मात्र त्याचा त्रास असह्य झाल्याने अखेर पीडितेने मार्च 2019 मध्ये दिंडोशी पोलिसांत तक्रार दाखल केली.  त्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु होता. अखेर गुलबर्ग हून पोलिसांनी आरोपीला अटक केली. (Mumbai Horror: 3 वर्षीय चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार; POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल)

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एका 22 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. अंधेरीतील हॉटेलमधील पार्टीदरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. (Pune Rape: प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना)

दरम्यान, बलात्कार, महिला अत्याचार, लैंगिक शोषण यांसारख्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. परंतु, तरी देखील बलात्काराच्या घटना वारंवार समोर येत आहेत.