Mumbai Pune Expressway आज 2 तास राहणार बंद!

दुपारी 12 ते 2 या वेळेत हा मार्ग प्रवाशांसाठी बंद ठेवला जाणार आहे.

Highways Image used for representational purpose | (Photo Credits: File Photo)

आज  मुंबई - पुणे (Mumbai Pune Expressway) प्रवास करणार्‍यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 31 जानेवारी, गुरूवार दिवशी मुंबई -पुणे हा महामार्ग दोन तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हा मार्ग प्रवाशांसाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळच्या वेळेत प्रवास करणार्‍या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. पहा पुण्याला पोहचण्याचे पर्यायी रस्ते कोणते? 

दोन तास पुणे -मुंबई महामर्ग बंद ठेवून या वेळेमध्ये पनवेल नजीक गॅंट्रीचं काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कळंबोली या पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  नक्की वाचा:  मुंबई - पुणे महामार्गावर प्रायव्हेट कारची लिफ्ट मागणं अजून एका मुंबईकर तरूणासाठी ठरला थरारक प्रवास, शस्त्राच्या धाकावर 34,000 हजारांची लूट

मुंबई -पुणे महामार्गावर सध्या वाहतुकीसाठी नवे दिशादर्शक लावण्याचे काम सुरू असल्याने काही दिवसांच्या ठराविक टप्प्यांनंतर वाहतूक बंद ठेवून ही कामं पूर्ण केली जात आहेत.