Mumbai Pune Expressway आज 2 तास राहणार बंद!

31 जानेवारी, गुरूवार दिवशी मुंबई -पुणे हा महामार्ग दोन तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हा मार्ग प्रवाशांसाठी बंद ठेवला जाणार आहे.

Mumbai Pune Expressway आज 2 तास राहणार बंद!
Highways Image used for representational purpose | (Photo Credits: File Photo)

आज  मुंबई - पुणे (Mumbai Pune Expressway) प्रवास करणार्‍यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 31 जानेवारी, गुरूवार दिवशी मुंबई -पुणे हा महामार्ग दोन तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हा मार्ग प्रवाशांसाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळच्या वेळेत प्रवास करणार्‍या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. पहा पुण्याला पोहचण्याचे पर्यायी रस्ते कोणते? 

दोन तास पुणे -मुंबई महामर्ग बंद ठेवून या वेळेमध्ये पनवेल नजीक गॅंट्रीचं काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कळंबोली या पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  नक्की वाचा:  मुंबई - पुणे महामार्गावर प्रायव्हेट कारची लिफ्ट मागणं अजून एका मुंबईकर तरूणासाठी ठरला थरारक प्रवास, शस्त्राच्या धाकावर 34,000 हजारांची लूट

मुंबई -पुणे महामार्गावर सध्या वाहतुकीसाठी नवे दिशादर्शक लावण्याचे काम सुरू असल्याने काही दिवसांच्या ठराविक टप्प्यांनंतर वाहतूक बंद ठेवून ही कामं पूर्ण केली जात आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2019 11:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).