COVID19 च्या लसीबद्दल पाठवल्या जाणाऱ्या फेक लिंक बद्दल पोलिसांनी नागरिकांना केले सतर्क
त्यानुसार विविध जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात फ्रंटलाईन वर्कर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. अशातच आता नागरिकांना लस दिली जाणार असल्या संदर्भात एक लिंक व्हायरल होत आहे.
देशभरासह राज्यात कोरोनाच्या विरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार विविध जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात फ्रंटलाईन वर्कर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. अशातच आता नागरिकांना लस दिली जाणार असल्या संदर्भात एक लिंक व्हायरल होत आहे. तर www.enrolforvaccination.com अशी वेबसाइटची लिंक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पण ही लिंक फेक असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(Nagpur: फेसबुक वरुन फ्रेंडशिप करणे वृद्धाला पडले महागात, परदेशी मैत्रिणीच्या नादात गमावले तब्बल 10 लाख)
लिंकच्या माध्यमातून खासगी माहिती जमा करुन ऑनलाईन फसवणूकीच्या वेळी ती वापरली जाऊ शकते यासाठी नागरिकांना त्या लिंक पासून सावध राहण्याची सूचना दिली गेली आहे. मुंबई पोलिसांनी याबद्दल ट्विट सुद्धा केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, सध्या फक्त अत्यावश्यक सेवासुविधा आणि फ्रंटलाइन वर्कर्सलाच लस दिली जात आहे. तसेच सरकारी वेबसाइटवर सुद्धा लसीकरणासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन प्रक्रिया उपलब्ध नाही आहे.(Mumbai: कुलाबा येथील मुलीला इन्स्टाग्रामवरील मित्रासोबत मैत्री करणे पडले महागात, घरातून पैशांसह दागिन्यांची केली चोरी)
Tweet:
तर मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीएसबी एस चैतन्य यांनी असे म्हटले की, फेक कोरोनाच्या लसी संदर्भातील लिंक बद्दल नागरिकांनी सतर्क रहावे. जेणेकरुन त्यांची ऑनलाईन फसवणूक होणार नाही. तर अद्याप सर्वसामान्यांना लस देण्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे लस देण्यासंदर्भात कोणताही मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका.