Sushant Singh Rajput Death Case: मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा योग्य तपास केला आहे- अस्लम शेख

सर्वसामान्यांपासून तर अनेक राजकीय नेते आणि बॉलिवूडच्या कलापर्यंत अनेकजण या प्रकरणात उडी घेऊ लागले आहेत.

Aslam Shaikh (Photo Credit: ANI)

सुशांतसिंह राजूपत मृत्यू प्रकरण (Sushant Singh Rajput Death Case) आता चांगलेच पेटलेले दिसत आहे. सर्वसामान्यांपासून तर अनेक राजकीय नेते आणि बॉलिवूडच्या कलापर्यंत अनेकजण या प्रकरणात उडी घेऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी (CBI Investigation) करण्यात यावी, अशा मागणी केंद्राकडून केली जात आहे. यावर मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) योग्य तपास केला आहे. मात्र, तरीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे केंद्र सरकार वाटत असेल तर त्यांनी करावी, असे अस्लम शेख म्हणाले आहेत.

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा योग्य तपास केला आहे. तरीही, सीबीआयमार्फत पुढील चौकशी झाली पाहिजे असे केंद्राला वाटत असेल तर त्यांनी ते करावे, असे महाराष्ट्र मंत्री अस्लम शेख म्हणाले आहेत. महत्वाचे म्हणजे, काहीजण सध्या घरीच असून शुटींगला जात नाहीत, अशा लोकांना या वादात पडायचे आहे. तसेच प्रसारमाध्यमात झळकता यावे म्हणून काहीजण या प्रकरणात उडी घेत आहे, असेही अस्लम शेख म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput Case: आदित्य ठाकरे यांच्याबाबत रिया चक्रवर्ती हिच्याकडून सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठे विधान

एएनआयचे ट्वीट-

याशिवाय महाराष्ट्रात शॉपिंग मॉल्स सुरु झाल्याने राज्यातील धार्मिक स्थळदेखील उघडण्यात करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला सुरु आहे. या मुद्द्यावरही अस्लम शेख यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ उघडण्याबाबत विचार सुरु असून सरकार लवकरच याबाबत घोषणा करेल, असे आश्वासन अस्लम शेख यांनी दिले आहे.