Prank Video: प्रॅंकच्या नावाने अश्लील व्हिडिओ बनवून फेसबूक, युट्यूबवर करायचे अपलोड; 3 जणांना अटक

प्रॅंकच्या नावाने अश्लील व्हिडिओ (Pornographic Videos) बनवून पैसे कमवणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Arrest | Representational Image | Photo Credits: File Photo

महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलने (Mumbai Police Cyber Cell) आज मोठी कारवाई केली आहे. प्रॅंकच्या नावाने अश्लील व्हिडिओ (Pornographic Videos) बनवून पैसे कमवणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुशिक्षित तीन जणांना अटक केली आहे. कोरोना काळात या आरोपींनी 17 युट्यूब चॅनेलवर 300 हून अधिक व्हिडिओ अपलोड करून कोट्यवधी रुपये कमवले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी आरोपी काही मुलींना तयार करायचे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी या व्हिडिओचे चित्रिकरण केले जात होते. हे व्हिडिओ जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटे असायचे.

आरोपी तरूणींना अभिनयाच्या बहाण्याने बोलवून घ्यायचे. त्यांना 500 ते 1500 पर्यंत पैसे ठरवले जायचे. त्यानंतर अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी सार्वजनिक ठिकणी म्हणजे बॅन्ड स्टॅन्ड, रॉक गार्डन, कार्टर रोड, अक्सा बीच, गिराई बीच यांसह महापालिकेच्या मैदानात घेऊन जात होते. त्याठिकाणी चित्रिकरण केल्यानंतर तो व्हिडिओ यूट्युब, फेसबूकवर अपलोड करायचे. त्यांनी बनवलेल्या या व्हिडिओला जवळपास 15 कोटी व्ह्यूज मिळत होते. महत्वाचे म्हणजे, त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओत तरूणींच्या खाजगी भागाला अतिशय चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला गेला जात होते. हे देखील वाचा- FACT CHECK Lockdown In Maharashtra: महाराष्ट्र 1 मार्चपासून खरंच होणार लॉकडाऊन? जाणून घ्या काय आहे सत्य

एएनआयचे ट्वीट-

मुकेश गुप्ता, जीतू गुप्ता, नटखट प्रिन्स असे तिन्ही आरोपींची नावे आहेत. मुकेश गुप्ता ठाण्यात एक कोचिंग क्लास चालवतो, जिथे 300 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी शिकायला येणाऱ्या मुलांचेही व्हिडिओ त्याने आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत. दुसरा आरोपी जीतू गुप्ता हा बीएचएमएसचा विद्यार्थी आहे. तर, तिसरा आरोपी नटखट प्रिन्स हा बीएमएमचा विद्यार्थी असून 2008 मध्ये इयत्ता दहावीत असताना त्याला 98 टक्के गुण मिळाले आहेत.