Mumbai: आता मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी पाळावे लागतील काही नियम व अटी; सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने जारी केल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना

सदर परिसरात अनेक मंत्र्यांची, विभागांची कार्यालये आहेत. त्यामुळे ही अत्यंत संवेदनशील अस्थापना असल्याने त्याची सुरक्षा ही महत्वाची बाब आहे.

Mantralaya (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबईमधील मंत्रालयात (Mantralaya) आत्महत्येचा प्रयत्न झालेली अनेक प्रकरणे याआधी समोर आली आहेत. आजही मुंबईत एका व्यक्तीने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयाच्या आत लावलेल्या सुरक्षा जाळीमुळे त्याचे प्राण वाचले. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. अशात आता राज्य सरकारने मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने काही सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मंत्रालय हे राज्यातील प्रशासकीय मुख्यालय अहे. सदर परिसरात अनेक मंत्र्यांची, विभागांची कार्यालये आहेत. त्यामुळे ही अत्यंत संवेदनशील अस्थापना असल्याने त्याची सुरक्षा ही महत्वाची बाब आहे. मंत्रालयात घडलेल्या अपत्कालीन घटना विचारात घेता सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालय परिसरात काही नवीन नियम लागू केले जात आहेत. आता वेब पोर्टल आणि मोबाई एपद्वारे अभ्यागतांची पूर्व नोंदणी करून नोंदणी केलेल्या वेळेप्रमाणे मंत्रालयामध्ये सुरक्षा तपासणी करून अभ्यागतांना प्रवेश मिळणार आहे.

मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांची आणि वाहनांची संख्या मर्यादित करण्यात येत अहे, जेणेकरुन मंत्रालयातील सोयी-सुविधांवर अनावश्यक ताण येणार नाही आणि अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा अबाधित राहील. मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना आरएफआयडी (RFID) स्वरुपाची प्रवेश पत्रिका देण्याची कार्यवाही सुरु आहे. तोपर्यंत मंत्रालयमध्ये प्रत्येक मजल्यासाठी कलर कोड पत्रिका देण्याची व्यवस्था केली जात आहे. सदर कलर कोड पत्रिका ज्या मजल्यासाठी असेल त्याच मजल्यावर संबंधित अभ्यागतांना प्रवेश मिळेल. (हेही वाचा: Maharashtra Onion Crisis: महाराष्ट्रातील कांदा प्रश्न लवकरच निकाली लागणार; अजित पवारांचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना फोन, व्यापाऱ्यांना दिले 'हे' आश्वासन)

मंत्रालयाचे कामकाज सध्याच्या कामकाज पध्दतीनुसार सायंकाळी 6.15 वाजता संपते, त्यामुळे मंत्रालयामध्ये अभ्यागतांना सायंकाळी 5.30 नंतर प्रवेश दिला जाणार नाही. मंत्रालयाच्या परिसरात बाहेरून कोणत्याही स्वरूपाचे खाद्यपदार्थ (कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे डबे सोडून) आणण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. मंत्रालय मुख्य इमारत व विस्तार इमारतीच्या टेरेसवर जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येत आहेत. मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांनी त्यांच्यासोबत 10,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेऊन मंत्रालयात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. मंत्रालयातील प्रवेशासाठीचे सर्व नियम व अटी तुम्ही ‘या’ ठिकाणी पाहू शकता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif