Mumbai News: चांदिवलीत अंगावर सौर पॅनल पडल्याने एकाचा मृत्यू, क्रेन चालकाला अटक
सोमवारी चांदिवलीतील एका उंच इमारतीत सौर पॅनेल दुरुस्त करत असताना ३१ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर सौर पॅनेल पडल्याने मृत्यू झाला.
Mumbai News: मुंबईतील (Mumbai) चांदिवली परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला ज्यामध्ये एका व्यक्तीने प्राण गमावले. सोमवारी चांदिवलीतील एका उंच इमारतीत सौर पॅनेल दुरुस्त करत असताना ३१ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर सौर पॅनेल पडल्याने मृत्यू झाला. पवई पोलिसांनी फलक उचलण्यासाठी जबाबदार असलेल्या क्रेन चालकाच्या विरोधात निष्काळजीपणामुळे आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा- माजी मॉडेल दिव्या पाहुजाची हत्या; समोर आला धक्कादायक व्हिडिओ,)
मिळालेल्या माहितीनुसार, नयन वाला असं मृत व्यक्तीचे नाव आहे. मृताचा भाऊ संजय वाला यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नयन हे रहेजा विहार, चांदिवली येथील मेफल लीफ सोसायटीत काम करत होते. तेव्हा दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मोहम्मद आरिफ शेख (40) असे आरोपीचे नाव आहे. तो इमारतीमधील फलक काढण्यासाठी फोर्कलिफ्ट वापरत असताना त्यातील एक नयनच्या डोक्यावर पडलं.या घटनेत तो गंभीर झाला. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेअंतर्गत पवई पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करून घेतला आहे. या अपघातानंतर घटनास्थळावरील रहिवासी आणि कामगारांसह इतरांनी पोलिसांनी माहिती दिली. पवई पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 304A अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि त्यानंतर त्याला अटक केली आहे.