मालमत्ता कर न भरणाऱ्या विरोधात पालिकेचा कठोर कारवाईचा बडगा: कार सोडवण्यासाठी थकबाकीदाराने भरले 50 लाख रुपये
पालिकेने गेल्या आठवड्यापासून थकबाकीदारांची वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रिज आदी वस्तू जप्त करण्यास सुरुवात केली आहे. आज अंधेरी एमआयडीसी परिसरातील ‘के पूर्व’ विभागातील ‘ई सी एच डी सिल्क मिल्स’ या कंपनीची इनोव्हा कार जप्त केली. त्यानंतर थकबाकीदाराने तात्काळ 50 लाखांचा धनादेश महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडे जमा केला आणि आपली जप्त केलेली कार सोडवली.
मालमत्ता कर (Property Tax) न भरणाऱ्या विरोधात यंदा मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे. पालिकेने गेल्या आठवड्यापासून थकबाकीदारांची वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रिज आदी वस्तू जप्त करण्यास सुरुवात केली आहे. आज अंधेरी एमआयडीसी परिसरातील ‘के पूर्व’ विभागातील ‘ई सी एच डी सिल्क मिल्स’ या कंपनीची इनोव्हा कार जप्त (Innova Car Seized) केली. त्यानंतर थकबाकीदाराने तात्काळ 50 लाखांचा धनादेश महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडे जमा केला आणि आपली जप्त केलेली कार सोडवली.
दरम्यान, अंधेरी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या भूखंड क्रमांक ए 69 या कंपनीकडे तब्बल 1 कोटी 96 लाख 87 हजार 276 रुपयांची थकबाकी मालमत्ता होती. या कंपनीला वारंवार नोटीस बजावूनही सदर कंपनीद्वारे मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे पालिकेने कंपनीची चल संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र अर्थसंकल्प 2020-21 मध्ये सरकारला राज्यातील विविध समस्यांवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या; 4 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
पालिकेने सर्वप्रथम या कंपनीच्या मालकीची इनोव्हा कार मंगळवारी जप्त केली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीने महापालिकेच्या ‘के पूर्व’ विभाग कार्यालयात धाव घेत 50 लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश जमा केला. त्यानंतर उर्वरित रक्कम लवकरात लवकर भरण्याची हमी घेऊन कार सोडण्यात आली. याअगोदर पालिकेने जुहूमधील मेस्को एअरलाईन्स कंपनीच्या हेलिकॉप्टर उभ्या करण्यात येणार्या जागेच्या मालमत्ता कराची रक्कम न दिल्यामुळे या कंपनीचे दोन्ही हेलिकॉप्टर जप्त केले आहेत. या कंपनीकडून महापालिकेला 11 कोटी रुपयांची थकबाकी अपेक्षित आहे.