धक्कादायक! विलेपार्ले येथे माय-लेकीची गळफास लावून आत्महत्या
ही घटना विलेपार्ले (Vile Parle) परिसरात गुरुवारी सकाळी घडली आहे.
वयोवृद्ध आई आणि तिच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना विलेपार्ले (Vile Parle) परिसरात गुरुवारी सकाळी घडली आहे. मृतांच्या घरात दासी म्हणून काम करणारी बाई सकाळी 8.30 च्या सुमारास आली. तेव्हा दोघीही दरवाजा उघडत नसल्यामुळे तिने मृतांच्या नातेवाईकांना सांगितले. त्यावेळी नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर स्थानिक पोलीस त्याठिकाणी पोहचल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी दोन्ही मायलेकीनी गळफास घेतल्याचे उघडकीस आले.
मीना परांजपे 73 आणि मंजिरी परांजपे 52 असे आत्महत्या केलेल्या मायलेकीचे नाव आहे. आई मीना आणि लेक मंजिरी परांजपे यांची दासी नेहमीप्रमाणे घरकाम करण्यासाठी आली होती. परंतु, अधिक उशीर होऊनही मीनी आणि मंजिरी दरवाजा उघडत नव्हत्या. त्यावेळी दासीने त्यांच्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईक आल्यानंतरही मीना आणि मंजिरी दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. नातेवाईकांचा फोन आल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर मीना आणि मंजिरी दोघींनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. हे देखील वाचा- सेक्स क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणांकडून उकळले 50 हजार; तरूणीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजिरी ही अविवाहित असून आपल्या आईसह विलेपार्ले येथे राहत होती. याशिवाय पोलिसांना त्यांच्याजवळ आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी मिळाली नाही.